हे विमान धावपट्टीवरुन घसरल्यानंतर 30 फूट खोल खाडीत कोसळलं. यानंतर त्याचे थेट 2 तुकडे झाले. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार लँडिंगच्यावेळी विमान पूर्ण वेगात होतं.
-
-
वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा कोझिकोड विमानतळावर लँडिग होत असताना थरकाप उडवणारा अपघात झाला.
-
-
हे विमान धावपट्टीवरुन घसरल्यानंतर 30 फूट खोल खाडीत कोसळलं. यानंतर त्याचे थेट 2 तुकडे झाले. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार लँडिंगच्यावेळी विमान पूर्ण वेगात होतं.
-
-
केरळमधील हा अपघात सायंकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी झाला. विमान लँडिग करत असताना धावपट्टीच्याही पुढे निघून गेलं. त्यानंतर धावपट्टीवरुन घसरुन विमानाचे थेट दोन तुकडे झाले.
-
-
या भीषण अपघातानंतर विमानात आग लागली नाही. त्यामुळे अपघाताची भीषणता मर्यादीत राहिली.
-
-
एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा विमानामध्ये (IX-1344) 2 पायलट, 4 क्रू मेंबर, 10 लहान मुलं, 174 प्रवाशांसह एकूण 190 लोक होते.
-
-
आतापर्यंत या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 123 लोक जखमी झाले आहेत. 15 जणांची स्थिती गंभीर आहे.
-
-
विमानाच्या पुढील भागात बसलेल्या प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सला गंभीर जखमा झाल्या आहेत. जवळपास 45 जखमींना जवळच्या रिम्स आणि मर्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
-
या अपघातात पायलट दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. दीपक साठे वायु सेनेचे निवृत्त पायलट होते. ते अंबालाच्या 17 स्क्वॉड्रन (गोल्डन एरो) आणि लढाऊ विमान मिग 21 चे पायलट होते. कॅप्टन साठे एअर फोर्स ट्रेनिंग अॅकेडमीमध्ये इंस्ट्रक्टर म्हणूनही होते.
-
-
या अपघातानंतर सर्वात आधी मदतीसाठी CISF चं बचाव पथक पोहचलं. CISF ने जवळपास 150 पॅक्स रिकामे केले.
-
-
आतापर्यंत या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 123 लोक जखमी झाले आहेत. 15 जणांची स्थिती गंभीर आहे.
Kerala Plane Crash Plane skids Photos