ठाणे : लॉकडाऊन कालावधीत घरी बसून काय करणार आम्हाला कंटाळा येतो असं म्हणणाऱ्या तरुणांसमोर (Kishor village youth lockdown work) मुरबाड तालुक्यातील किशोर गावाच्या तरुणांनी नवा आदर्श ठेवला आहे. गावतील 20 ते 25 तरुणांनी श्रमदान करुन गावात दररोज चांगले उपक्रम सुरु ठेवले आहेत.
वेळेचा सदुपयोग करताना या तरुण मुलांनी गावकऱ्यांच्या हितासाठी स्वयंस्फूर्तीने केलेल्या सामाजिक कार्याची चर्चा मुरबाड तालुक्यात केली जात आहे. (Kishor village youth lockdown work)
स्थानिक ग्रामपंचायत मदत करेल किंवा नाही करेल या विचारात न पडता तरुणांनी गावातील डम्पिंग ग्राऊंड साफ करणे, विद्युत तारावर आलेल्या झाडांची छाटणी करणे , व्यायामशाळा बांधणे अशी कामे लॉकडाऊन कालावधीत केली आहेत.
मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यापूर्वी गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावं या भावनेतून गावातील तरुणांनी विहिरीतील गाळ साफ करण्याचा निर्णय घेतला.
बघता बघता या तरुणांनी विहिरीतील गाळ काढून विहीर अक्षरश: चकाचक केली. किशोर गावच्या या तरुणाचं सामाजिक भान इतर तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
(Kishor village youth lockdown work)