लंडन : कोरोना विषाणूवर लस तयार करणाऱ्या अमेरिकेच्या फायजर कंपनीने मागील काही दिवसांपासून ब्रिटेनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे. मत्र, लस घेतल्यानंतर काही नागरिकांना अॅलर्जीचा त्रास होत असल्याचं समोर आलं. यानंतर फायजरने ज्या नागरिकांना खाद्य पदार्थ किंवा लसीची अॅलर्जीची पार्श्वभूमी आहे त्यांना ही लस न देण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या या लसींमुळे जग कोरोनावर मात करु शकते अशी आशा तयार झाली होती. मात्र, कोरोना लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांकडे पाहता चिंता वाढली आहे (Know about Side effects of Covid 19 vaccine pfizer).
तरुणांमध्ये लसीचे सर्वाधिक दुष्परिणाम
फायजरची लस एमआरएनएवर ( mRNA) आधारित आहे. एमआरएनए लस मानवी शरीरात इंजेक्ट केली जाते. ही लस शरीरातील इम्यून सिस्टमला कोरोना विषाणूशी लडण्यासाठी तयार करते. या लसीमुळे अँटीबॉडी तयार होतात आणि टी-सेल सक्रीय होऊन संसर्ग झालेल्या सेल नष्ट करण्याचं काम करतात. फायजरने 40 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांना 3 टप्प्यातील चाचणीत सहभागी करुन घेतलं होतं.
या चाचणीतही काही प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं. या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 80 टक्के लोकांना लस घेतल्यानंतर इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी त्रास झाल्याचं समोर आलं होतं. अनेक लोकांनी थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखी होत असल्याचंही म्हटलं होतं. काही लोकांना लिम्फ नोड्समध्ये सूज आल्याचंही दिसलं.
फायजरचे दुष्परिणाम
फायजर लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अनेक देशांनी परवानगी दिली आहे. मात्र, एफडीएने दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या सुरुवातीच्या चाचणीत 4 जणांना ‘बेल्स पाल्सी’ (अर्धांगवायू/पॅरालिसीस) झाल्याचं समोर आलं होतं. या अवस्थेत अर्ध्या चेहऱ्याचे स्नायू निकामी होतात. असं असलं तरी हे अगदी काही वेळेसाठी होतं आणि पुन्हा शरीर सामान्य होतं. हे कशामुळे होतं याचं अद्याप निश्चित कारण समजू शकलेलं नाही. सर्व डॉक्टरांना लसीकरणानंतर काय दुष्परिणाम होतात याचं निरिक्षण करण्यास सांगितलं आहे.
हेही वाचा :
‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर
अमेरिकेत लसीकरणाची मोठी तयारी, मेक्सिकोचीही फायझरच्या लसीला परवानगी
कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा
Know about Side effects of Covid 19 vaccine pfizer