कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकलेंनी अखेर माघार घेतली आली. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याने बिचुकलेंवर अर्ज माघार घेण्याची वेळ आलीय. दरम्यान, आजारी असल्याने उमेदवारी अर्ज भरता आला नसल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election) 19 उमेदवारांनी 27 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्जाची छाननी होणार असून 28 एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. काँग्रेसचे नेते दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक होत आहे.
भाजपकडून कोल्हापूर उत्तरची उमेदवारी जाहीर करण्यात आलेले सत्यजीत कदम हे कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक असून ताराराणी आघाडीचे गटनेते राहिलेले आहेत. 2010 मध्ये कदम काँग्रेसकडून कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2011 आणि 2012 मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून देखील काम केलं आहे. 2015 मध्ये कोल्हापूर महापनगरपालिकेमध्ये ताराराणी आघाडीचे गटनेते म्हणून कदम यांची निवड झाली होती.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील एकाही जागेवर भाजपला विजय मिळवता आला नव्हता.त्यामुळं विरोधी पक्षांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत भाजप खातं उघडणार का हे पाहावं लागणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. तर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार ज्या पक्षाकडे मतदारसंघ आहे त्या पक्षाला आघाडीची उमेदवारी द्यायची असा धोरणात्मक निर्णय करण्यात आलाय. त्यामुळे क्षीरसागर यांची ही मागणी अमान्य झालीय.
चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
इतर बातम्या