कोल्हापूर | 17 फेब्रुवारी 2024 : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पक्षाचं पहिलं महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पहिला मेळावा होत आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या महामेळाव्यात दमदार भाषण केलं. लेकाचं दमदार भाषण ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. याबाबत एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्विट केलं आहे. श्रीकांतचं भाषण ऐकताना सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला, असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले.
यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.
सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले.
यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे… https://t.co/E5WkyNQFcU pic.twitter.com/rQxAGG965l
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. शिवाय मनातील भावनाही एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवल्या आहेत. शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंच्या भाषणाचं कौतुक केलंय.
‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात… https://t.co/fQTet7K5rG pic.twitter.com/bRH52jLOaK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडतंय. या महाअधिवेशनात शिवसेनेचे वरिष्ठ नेते, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्रीकांत शिंदे यांच्याही डोळ्यात पाणी आलं. आनंद दिघेसाहेब गेल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसैनिकांचा आधार बनले. शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानलं. काहीही झाल्यावर सर्वप्रथम पोहचणारे शिवसैनिक म्हणजे शिंदे साहेब… मी त्यांनी कायम शिवसैनिकांमध्ये पाहिलंय, असं म्हणताना श्रीकांत शिंदेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.