Panchganga River | इचलकरंजीत दमदार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी 68.3 फुटांवर

| Updated on: Aug 20, 2020 | 5:20 PM

पाऊस आणि धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Panchganga River | इचलकरंजीत दमदार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी 68.3 फुटांवर
Follow us on

कोल्हापूर : इचलकरंजी शहर आणि परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पाऊस (Panchganga River Water Level) आणि धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील 24 तासात पाणीपातळीत 1.1 फुटांनी वाढ झाली आहे. आज पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 68.3 फुटावर गेली आहे. दरम्यान, माणकापूर-हुपरी मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक दुसर्‍यांदा बंद करण्यात आली आहे (Panchganga River Water Level).

मागील चार दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. राधानगरी, कोयना, चांदोली धरणातून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे.

काल (19 ऑगस्ट) रात्री पंचगंगा नदीची पाणी पातळी 67.2 फुटांवर होती. तर आज सकाळी त्यामध्ये वाढ होऊन ती 68.3 फुटावर पोहोचली होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास शिरदवाडच्या दिशेला असलेल्या माणकापूर-हुपरी मार्गावर पाणी आल्याने खबरदारी म्हणून हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरुच आहे.

पाण्याची उंची वाढत नसली तरी पाणी नदीकाठावरील भागात पसरु लागल्याने पूराची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तर पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फुटावर तर धोका पातळी 71 फुटांवर आहे. सध्या पुराचे पाणी हळूहळू नागरी वस्तीमध्ये शिरत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगरपरिषद आपत्कालीन विभागाने दिला आहे.

Panchganga River Water Level

संबंधित बातम्या :

Rain Updates: कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मराठवाड्यातही मुसळधार, नदी-नाल्यांना पूर

कोल्हापुरात खासदार धैर्यशील मानेंसमोर आंदोलक महिलांच्या पंचगंगा नदीत उड्या