गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 17 फेब्रुवारी 2024 : कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटचं महा अधिवेशन होत आहे. इथं बोलताना महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव घेत जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ठाण्यात मुक्कामाला जरी आले तरी एकनाथ शिंदे यांचा बाल सुद्धा वाकडा होणार नाही. त्यांनी कितीही टीका केली तरी काहीही होणार नाही. कारण जनता आमच्या पाठीशी आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.
आधी कल्याणमध्ये त्यांनी दौरा केला. तेव्हा 170 माणसा तिथे होती आणि दुसऱ्या ठिकाणी 300 च्या आसपास माणसं होती. तिसऱ्या ठिकाणी 500 साडेपाचशे लोक आले होते. त्यांना वाटतं रोज रोज आल्याने संख्या वाढेल. पण संख्या कमी झाल्याचा अनुभव त्यांना मिळेल.उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ठाण्यात मुक्कामाला जरी आले तरी एकनाथ शिंदे यांचा बाल सुद्धा वाकडा होणार नाही, असं शंभुराज देसाई म्हणाले.
संजय राऊत यांना आम्ही फार गांभीर्याने घेत नाही. त्यांना दुसरं काही काम नाही. एवढा मोठा महा अधिवेशन त्यांना कधी घेता आलं नाही. असं अधिवेशन त्यांनी कधी घेतलं हे त्यांनी सांगावं. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात असं कधी कोणाला बोलता आलं का? हे सामान्य शिवसैनिकाचे महा अधिवेशन आहे, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे देशाने स्वीकारलं आहे. महत्त्वाचे निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतले. जागतिक मान्यता प्राप्त असणारा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. चांगल्याला वाईट म्हणण्याचं हे संजय राऊत यांचं असू शकतं. संजय राऊत यांचा संविधानावर विश्वास आहे ना? संजय राऊत खासदार झाले होते ते आमच्या मतावर…, असा टोलाही शंभुराज देसाई यांनी लगावला आहे.