कोल्हापूर : रुबाबदार कोल्हापुरी चप्पल आता अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन विक्रीस प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. (Kolhapuri chappal is now available on e-commerce site Amazon, Online sales launched by Hasan Mushrif)
कोल्हापुरातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ठ उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्या महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी या ऑनलाईन विक्री मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून या मोहीमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध
माझ्या हस्ते ऑनलाइन विक्री प्रारंभ..उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची उत्पादने अमेझॉन डिजीटल बाजारपेठेत
देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध pic.twitter.com/mWtVwD2Tfv— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) October 12, 2020
कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूर शहराची ओळख आहे. या चपलांना देशभरातील लोकांकडून तसेच महाराष्ट्रात येण्याऱ्या पर्यटकांकडून नेहमीच पसंती मिळते. सुबक आकार, त्यावरील नक्षीकाम आणि टिकाउपणा हे या चपलांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
इतर चपलांप्रमाणे कोल्हापुरी चपलांच्या टाचा उंचावलेल्या नसतात. या चपला सपाट असतात. या चपलांना चामड्याचा पृष्टभाग असून तळ लाकडाचा असतो. घसरू नये म्हणून तळावर रबराचे आच्छादन असते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चपलांचा आवाज. या चपला बनवताना त्यात एक फळ वापरले जाते, ज्यामुळे या चपला घालून चालताना एक विशिष्ट आवाज येतो.
संबंधित बातम्या
Hasan Mushrif | फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली : हसन मुश्रीफ
Hasan Mushrif | “मुख्यमंत्र्यांचं काम उत्तम, काही जणांकडून बदनामीचे प्रयत्न” – हसन मुश्रीफ
पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता
Sarkari Naukri : राज्यात पोस्ट खात्यात 1371 जागांसाठी मेगाभरती, 18 हजारांपासून 69 हजारपर्यंत पगार
Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी