मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री भारती सिंहचे (Bharti Singh) नाव समोर आल्यानंतर, तिला अटकही करण्यात आली होती. या सगळ्याचा परिणाम आता तिच्या करिअरवर देखील झाला असल्याचे बोलले जात आहे. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची सोनी टीव्हीच्या ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमातून हकालपट्टी झाल्याचे कळते आहे. यावर भारतीचा सहकलाकार, कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने प्रतिक्रिया दिली आहे (Krushna Abhishek reaction on Bhari singh’s exit from The Kapil Sharma Show).
एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना कृष्णा म्हणाला, ‘भारती ‘द कपिल शर्मा शो’ कार्यक्रम सोडणार असल्याची बातमी ही केवळ एक अफवा आहे. सोनी वाहिनीने असे कोणतेही पाऊल उचललेले नाही, ज्यामध्ये भारती सिंह यांना ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यास सांगितले गेले आहे.’
‘काहीही झाले तरी कपिल आणि मी नेहमी भारती सिंहबरोबर उभे राहू. काहीही झाले तरी, मी भारतीचे समर्थन करीन. ती कामावर परत आलीच पाहिजे. जे व्हायचे ते होऊ दे. मी आणि कपिल, किंबहुना आम्ही सगळेच भारती आणि हर्ष यांच्यासमवेत उभे आहोत. तीला माझे संपूर्ण सहकार्य मिळेल आणि चॅनेलने आतापर्यंत असे कोणतेही पाऊल उचललेले नाही. आम्हालाही याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही’, असे कृष्णा अभिषेक याने म्हटले आहे.
कपिलच्या कॉमेडी शोमध्ये काम करणारा किकू शारदा म्हणतो की, ‘आम्ही काल शूट केले आणि भारती आमच्या शूटिंगसाठी हजर नव्हती. पण भारती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये नसणार याच्या बद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. आणि ती काल शूटवर हजर नव्हती कारण, भारतीचे काही शूट नव्हते आणि कपिल शर्माच्या शोचा भाग भारती नसणार अशा कुठल्याच निर्णया बद्दल माहिती नाही.’ (Krushna Abhishek reaction on Bhari singh’s exit from The Kapil Sharma Show)
आता, भारती कपिल शर्माच्या शोमध्ये कधीही दिसणार नसल्याचे कळते आहे. केवळ कपिल शर्मा शोमध्येच नाही तर, भारती आणि तिचा नवरा सोनीच्या कोणत्याही शोमध्ये भाग घेऊ शकणार नसल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे भारतीचा खास मित्र, अभिनेता कपिल शर्मा चिडला असल्याचे कळते आहे. कपिलचे म्हणणे असे आहे की, सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी घालू नये.
सोनी टीव्ही नेहमीच त्यांच्या चॅनेलची प्रतिमा “स्वच्छ” राखण्याचा प्रयत्न करते. सोनी टीव्ही एक फॅमिली चॅनेल आहे आणि कपिल शर्मा शो हा फॅमिली शो आहे, असे वाहिनीचे म्हणणे आहे. त्यामुळे या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींनी सहभागी नसावे, अशी चॅनेलची भूमिका आहे.( Krushna Abhishek reaction on Bhari singh’s exit from The Kapil Sharma Show)
कपिल शर्माच्या अडचणीच्या वेळी भारती सिंगने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे. अलीकडे, जेव्हा कपिल आजारी पडला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या शोवर होत होता. त्यावेळी भारतीने त्याची मदत केली होती. कपिल आणि भारती दोघेही पंजाबचे आहेत. कपिल भारतीला त्याची छोटी बहीण मानतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीच्या वेळी हा शो भारतींकडून काढून घेतला जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे.
सोनी टीव्हीने एखाद्या कलाकाराशी बंदी घालण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीसुद्धा सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिकवर अनेक सेलिब्रिटींनी ‘मीटू’ आरोप केले तेव्हा, सोनी टीव्हीने त्यांना चॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
(Krushna Abhishek reaction on Bhari singh’s exit from The Kapil Sharma Show)
Bharti Singh | कपिल शर्मानंतर कृष्णा अभिषेक भारतीच्या समर्थनार्थ पुढे, टीका करणाऱ्या राजू श्रीवास्तवांना फटकारले!https://t.co/QY95SWb66M#krushnaabhishek #BhartiSingh #RajuSrivastava
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020