इचलकरंजी: शहराजवळ असणाऱ्या खिद्रापूर, अकिवाट, टाकळीवाडी या भागातील बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. कुरुंदवाड पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. बनावट नोटा छापण्याची छपाई मशीन, लॅमिनेशन मशीन, इलेक्ट्रीक पॅनेल, कागदाचे गट्टे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगेंनी दिली. (Kurundwad police arrested four accused in fake currency note racket)
जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह पोलीस नाईक प्रकाश हंकारे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते असिफ शिराजभाई यांच्या पथकाने खिद्रापूर, अकिवाट, टाकळीवाडी भागात छापा टाकून बनावट नोटा बनवणारे रॅकेट उघडकीस आणले. बनावट नोटा रॅकेटचे धागेदोरे कर्नाटकात आहेत, असेही घाडगे म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी 2 हजार रुपयांच्या 51 तर 100 रुपयांच्या 99 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. चार वर्षांपूर्वी याच भागातील दत्तवाड परिसरात सांगली पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर पुन्हा बनावट नोटा प्रकरण समोर आल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक परिसरात खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या :
Pune Crime | पुणे बनावट नोटांप्रकरणी 6 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी
पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त
(Kurundwad police arrested four accused in fake currency note racket)