भोपाळ (मध्य प्रेदश) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Labor travel in cement mixer) आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद झाल्यामुळे मजूर आपल्या घरी जात आहेत. पण लॉकडाऊनमध्ये सर्व सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकजण घरी पायी जात आहेत. याच दरम्यान इंदूरमध्ये 18 मजुरांनी थेट सिमेंट काँक्रिट मिक्सरमधून घरी जाण्यासाठी प्रवास केला. इंदूर-उज्जैन रोडवर नाकाबंदी सुरु असताना हा प्रकार समोर आला (Labor travel in cement mixer) आहे.
“इंदूर-उज्जैन रोडवर आज (2 मे) सकाळी पंथपिपलाई बॉर्डरवर पोलिसांनी एक सिमेंट काँक्रिटचा मिक्सर थांबवला. पोलिसांनी थांबवल्यामुळे चालक घाबरला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी सिमेंट मिक्सर चेक केला असता त्यामध्ये 18 मजूर लपून बसलेले होते. त्यानंतर सर्वांना पोलिसांनी बाहेर काढून ताब्यात घेतले आहे. त्यासोबत सिमेंट मिक्सरही ताब्यात घेतला आहे”, असं पोलीस अधिकारी उमाकांत चौधरी यांनी सांगितले.
हे सर्व मजूर महाराष्ट्राहून उत्तर प्रदेश लखनऊमध्ये जात होते. यावेळी मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोलिसांनी हा सिमेंट मिक्सर थांबवून चौकशी केली असता मिक्सरमध्ये काही मजूर असल्याचे समोर आले. त्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करुन इतर सर्व मजुरांना मध्य प्रेदशात मजुरांसाठी तयार केलेल्या निवासी गृहात पाठवले.
#Indore : Cement concrete mixer मैं बैठकर 18 लोग #Lucknow जा रहे थे। Police ने पकड़ा ! #SocialDistanacing ??? ??♀️ pic.twitter.com/fwnzwrXTPD
— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) May 2, 2020
या घटनेचा एक व्हिडीओ ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक एक करुन सर्व मजूर सिमेंट मिक्सरमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
नुकतेच तेलंगणा, नाशिक येथून मजुरांना आपल्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन पाठण्यात आल्या आहेत. त्यासोबत इतरही राज्यात काही विशेष ट्रेन मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरु केल्या जाणार आहेत. पण मजूर स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
संबंधित बातम्या :
Lockdown : कांजूरमार्गवरुन अकोल्याकडे मजूर रवाना, 600 किमी पायपीट करण्याची तयारी
लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद, मजूर हैद्राबादहून नागपुरात चालत, यूपीच्या कुटुंबाची 97 तास पायपीट