Jamyang Namgyal | लडाखच्या भाजप खासदाराला प्रदेशाध्यक्षपदाची बक्षिसी, चंद्रकांतदादांनीही पाठ थोपटली

| Updated on: Jul 20, 2020 | 5:21 PM

आम्हाला खात्री आहे की आपला पक्ष आणि कार्यकर्ते तुमच्या समर्थ नेतृत्वात जनतेच्या हितासाठी समर्पणाने कार्य करतील, अशा सदिच्छा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.

Jamyang Namgyal | लडाखच्या भाजप खासदाराला प्रदेशाध्यक्षपदाची बक्षिसी, चंद्रकांतदादांनीही पाठ थोपटली
Follow us on

नवी दिल्ली : लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्याकडे लडाख भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यासंदर्भात घोषणा केली. कलम 370 रद्द करण्याच्या समर्थनात नामग्याल यांनी केलेल्या भाषणामुळे पंतप्रधान मोदीही प्रभावित झाले होते. (Ladakh BJP MP Jamyang Namgyal appointed as State President of BJP Ladakh)


“आम्ही महाराष्ट्र भाजप परिवाराकडून जामयांग सेरिंग नामग्याल यांची लडाख भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करतो. आम्हाला खात्री आहे की आपला पक्ष आणि कार्यकर्ते तुमच्या समर्थ नेतृत्वात जनतेच्या हितासाठी समर्पणाने कार्य करतील.” अशा सदिच्छा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.

विधानसभा निवडणुकांच्या आधी पुण्यातील कोथरुडमध्ये ‘एक चर्चा कलम 370, 35 अ आणि लडाखवर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी लडाखचे खासदार जामयांग नामग्याल आणि चंद्रकात पाटील हे दोघे या चर्चेत सहभागी झाले होते.

कोण आहेत जामयांग सेरिंग नामग्याल?

34 वर्षांचे जामयांग सेरिंग नामग्याल पहिल्यांदाच खासदारपदी निवडून आले आहेत. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठं लोकसभा क्षेत्र असलेल्या लडाखचे ते खासदार आहेत. वर्षभरात त्यांनी संसदेत चांगलीच चुणूक दाखवून दिली.

हेही वाचा : लडाखच्या भाजप खासदाराची संसदेत तुफान फटकेबाजी, मोदींकडून भाषणाचा व्हिडीओ शेअर

सेरिंग यांचा जन्म 4 ऑगस्ट 1985 रोजी लेहमधील माथो गावात झाला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सेरिंग यांचा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे.

जम्मू काश्मीरातील कलम 370 वर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी जोरदार भाषण केलं होतं. या भाषणामुळे प्रभावित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सेरिंग यांच्या भाषणाचा व्हिडीओही शेअर केला होता. लडाखमधील जनतेवर कायम अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त करत कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्यांना नामग्याल यांनी गप्प केलं होतं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्या खासदारांवर सेरिंग तुफान बरसले होते. “जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारांनी लडाखमधील नागरिकांना नोकरी देताना नेहमीच पक्षपात केला. काँग्रेसने कलम 370 चा गैरवापर करत लडाखमधून बौद्ध संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला. लडाखची जनता केंद्रशासित प्रदेश होण्याच्या बाजूने आहे”अशी भूमिका सेरिंग यांनी मांडली होती.

VIDEO : जामयांग नामग्याल यांचं गाजलेलं भाषण

(Ladakh BJP MP Jamyang Namgyal appointed as State President of BJP Ladakh)