मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विटरवरुन आभार व्यक्त केले आहेत. मंगेशकर कुटुंब राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे सील केल्यानंतर योग्य काळजी घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही लतादीदींना आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद दिले. (Lata Mangeshkar thanks CM Uddhav Thackeray for care and effective management of sealed Prabhukunja building)
लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी मुंबई महापालिकेने चार दिवसांपूर्वी सील केली. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी आभार मानले,
“नमस्कार, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे मनापासून आभार. तसेच सीलबंद इमारतींच्या देखभाल व प्रभावी व्यवस्थापनासाठी डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांचा विशेष उल्लेख.” असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले आहे.
Namaskaar,
Heartfelt thank you to our CM Uddhav Thackeray ji and @OfficeofUT. Also, special mention of Mr. Prashant Gaikwad Asst. Comm. D ward
Dr. Pramod Patil- MOH- D ward, for their care and effective management of sealed buildings.— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) September 2, 2020
“आदरणीय दीदी, नेहमीप्रमाणेच निश्चल प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लता मंगेशकर यांचे आभार मानले. ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबातील ऋणानुबंध सर्वश्रुत आहेत. लतादीदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मोठे बंधू मानत असत. (Lata Mangeshkar thanks CM Uddhav Thackeray for care and effective management of sealed Prabhukunja building)
Aadarniya didi, thank you for your steadfast love and blessings, as always?? https://t.co/QKwNHD01uQ
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 2, 2020
प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह बंधू हृदयनाथ मंगेशकर, बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीही आहेत. त्यामुळे सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या एकमताने सील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मंगेशकर कुटुंबियांनी परिपत्रक जारी करत याविषयी माहिती दिली होती “आम्हाला आज संध्याकाळपासून (29 ऑगस्ट) प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. प्रभुकुंज सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयस्कर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं जरुरीचं आहे” (Lata Mangeshkar thanks CM Uddhav Thackeray for care and effective management of sealed Prabhukunja building)