लातूर : राज्यात काल (21 फेब्रुवारी) महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात (Food poisoning at latur) आले होते. लातूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी आणलेली भगर खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील औसा तालुक्यात याकतपूर हे गाव आहे. या गावातील अनेक जणांनी उपवास असल्याने जवळच्या किराणा दुकानातून भगर विकत घेतली. ती खाल्ल्यानंतर अनेकांना डोके दुखी, उलटी, मळमळ, जुलाब असे त्रास होऊ लागले. यानंतर या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवल्यानंतर विषबाधेचा प्रकार समोर आला. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
दरम्यान ज्या भगरपासून विषबाधा झाली त्याचे नमुने तपासणीसाठी अन्न भेसळ परीक्षण विभागाकडे परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी सध्या तपास सुरु (Food poisoning at latur) आहे.