नागपूर : नागपूर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला (Leopard Fell In Well ) वाचवण्यात वन विभागाच्या आधिकाऱ्यांना यश आलं आहे. तब्बल दीड तासच्या प्रयत्नांनंतर या बिबट्याला वाचवण्यात आलं आहे (Leopard Fell In Well ).
विहिरीत पडलेल्या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. दीड तासांच्या मिशन रेस्क्यूनंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून, जंगलात सोडण्यात आलं.
नागपूर जिल्ह्यातील पारशीवणी परिसरात एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. हे कळताच शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर या बिबट्यासाठी ‘मिशन रेस्क्यू’ सुरु झालं.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत तरंगणारा कडा सोडला. आपला जीव वाचवण्यासाठी बिबट्या तरंगत्या कड्यावर आला आणि त्यानंतर पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. बिबट्या पिंजऱ्यात आल्यावर त्याला बाहेर काढून जंगलात सोडण्यात आलं. दीड तास बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं (Leopard Fell In Well ).
तब्बल 105 दिवसांनी ताडोबाची सफारी सुरु, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरणhttps://t.co/X8QCq11otZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
संबंधित बातम्या :
गडचिरोलीत हत्ती गाळात रुतला, तडफडून थकला, 20 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू