नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Liquor Close Nagpur Person died) संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं असून सर्व दारुची दुकाने बंद आहेत. यामुळे दारु मिळत नसल्याने अनेक तळीराम हताश झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून दारु न मिळाल्याने एका व्यक्तीची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरात हे घटना घडली आहे.
नागपूरमधील एमआयडीसी भागात राहणाऱ्या वैभव मनोहर मोते (Liquor Close Nagpur Person died) असे या मृताचे नाव आहे. वैभव मोते यांना दारुचे प्रचंड व्यसन होते. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून शहरातील दारुची दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून त्यांना दारु मिळाली नाही. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती, असं म्हटलं जात आहे.
वैभव हे रविवारी (29 मार्च) रोजी त्यांच्या राहत्या घरी आजारी अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात भरती केले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
तर दुसरीकडे काल संचारबंदीमुळे दारु मिळत नसल्याच्या कारणातून यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीत हा धक्कादायक प्रकार घडला. दारु मिळत नसल्याने हताश झालेल्या यंत्रमाग कामगाराने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागिरक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आली (Liquor Close Nagpur Person died) आहे.
संबंधित बातम्या :