नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. तसेच राज्यात संचारबंदीही लागू केली (Liquor selling in medical store nagpur) आहे. यादरम्यान जीवनावश्यक सेवा सोडल्यास इतर सर्व दुकानं बंद आहेत. किराणा, बाजारपेठ, दूध आणि मेडिकल सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या दरम्यान नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. थेट मेडिकल स्टोअर्समधूनच दारुची विक्री सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ (Liquor selling in medical store nagpur) उडाली आहे.
नागपूर येथील सेंट्रल इव्हेन्यू मार्गावरील दोसर भवन चौकात कांचना मेडिकल स्टोअर्समधून दारुची विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या स्टोअर्सवर छापा टाकला. या छाप्यात मिनरल वॉटरच्या बॉक्समध्ये बिअरच्या 80 बॉटल्स आढळल्या आहेत. पोलिसांनी दारु विक्रेता निशांत गुप्ताला अटक केली आहे. मेडिकल स्टोअर्समधून दारु विक्री होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्रात संचारबंदीदरम्यान सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे तळीरामांना दारु मिळणे कठीण झालं आहे. मात्र नागपुरात थेट मेडिकल स्टोअर्समधून दारुची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने नागपूर पोलीस दारु विक्रेत्यांचा कसून शोध घेत आहेत.
सॅनिटायजरमधून दारुची विक्री
याशिवाय नागपूरमध्ये दारु विक्रीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये दारुची दुकानं बंद असल्यामुळे नशेसाठी हँड सॅनिटाजरचा वापर करण्यात येत होता. हँड सॅनिटायजरमध्ये 70 टक्के दारु असल्याचे काही जण मद्यपींना सांगत होते. त्यानंतर याची विक्री सुरु होती. पोलिसांनी या विरोधात पाच आरोपींना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागरिक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर