नागपूर : दारुची तस्करी करण्यासाठी नागपुरातील तस्करांनी आता अनोखी शक्कल वापरण्यास (Liquor Smuggling) सुरुवात केली आहे. नागपुरात कांद्याच्या पोत्याखालून दारुची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई करत 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे (Liquor Smuggling).
विदर्भातील दारु तस्करांनी अफलातून शक्कल लढवत कांद्याच्या बहाण्याने दारुची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. हिंगणघाटात कांद्याखाली दारु लपवून मद्य तस्करी केली जात असल्याचं समोर आलं. वर 300 पोते कांदे आणि खाली तब्बल 12000 दारुच्या बाटल्या लपवून दारुची तस्करी केली जात होती. कांदे दरवाढीचा दारु तस्कर असाही वापर करतील याचा कोणी विचारही केला नसेल.
हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई करत या 12000 दारुच्या बाटल्यांसह 300 पोते कांदेही जप्त केले. यावेळी दारु तस्करांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्रास दारुची तस्करी होते.
देशी दारुची तस्करी जोमात, भंडारा जिल्ह्यात 8 लाखांची दारु जप्त, सहा जणांना बेड्याhttps://t.co/Xu53kjKeFE
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
Liquor Smuggling
संबंधित बातम्या :
अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक, नालासोपाऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 10 जण ताब्यात