Live Update : मराठ्यांच्या दबावाखाली MPSC परीक्षा रोखणे हा चुकीचा पायंडा : प्रकाश शेंडगे

| Updated on: Oct 10, 2020 | 1:24 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर

Live Update :  मराठ्यांच्या दबावाखाली MPSC परीक्षा रोखणे हा चुकीचा पायंडा : प्रकाश शेंडगे
Follow us on

[svt-event title=” मराठ्यांच्या दबावाखाली MPSC परीक्षा रोखणे हा चुकीचा पायंडा : प्रकाश शेंडगे” date=”10/10/2020,1:19PM” class=”svt-cd-green” ] ओबीसी समाजाच्या प्रश्‍नांसाठी राज्य सरकारने उपसमिती नेमली ही समिती काय नवीन नाही. मराठा उपसमितीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्‍नांसाठी अनेक निधीचा तरतूद करण्यात आली, पण ओबीसींच्या प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने एकही निर्णय घेतलेला नाही. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली पण यूपीएससीची परीक्षा पुढे ढकलली गेली नाही हा खरा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या दबावाखाली राज्य सरकारने नोकर भरती एमपीएससी परीक्षा थांबवली हा चुकीचा पायंडा आहे. छत्रपती संभाजी राजे तलवार काढण्याची भाषा करत आहेत हे कोणाविरोधात तलवार काढतायेत? ओबीसी समाजाच्या विरोधात तलवार काढणार आहेत का? छत्रपती उदयनराजे आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत हे दोन्ही राजे परस्परविरोधी बोलत आहेत. सरकारने आता ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे – प्रकाश शेंडगे, नेते ओबीसी [/svt-event]

[svt-event title=”राज्य सरकारकडून ओबीसींवर अन्याय – प्रकाश शेंडगे” date=”10/10/2020,1:24PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”कल्याणमध्ये नगरसेवक निधीच्या कामांसाठी भाजप आक्रमक, उपोषणाचा इशारा ” date=”10/10/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ] कल्याण : कोरोना काळात नगरसेवकांची नगरसेवक निधीसह इतर विकासकामाना ब्रेक लागला आहे .याबाबत आज भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राहुल दामले व भाजप नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेत कामे मार्गी लावण्याची मागणी केली तसेच 12 तारखेपर्यंत काही दखल घेतली नाही तर पालिका मुख्यालयातच भाजप नगरसेवक उपोषण छेडणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नेते राहुल दामले यांनी दिला, या आंदोलनात शिवसेनेचे नगरसेवक देखील सहभागी होणार अशी आशा दामले यांनी व्यक्त केली आहे [/svt-event]

[svt-event title=” कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई” date=”10/10/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही काही नागरिक, रिक्षा टॅक्सीचालक बेजबाबदारपणे विनामास्क प्रवाशांसह नियमांचं उल्लंघन करत आहेत. अशा बेजबाबदार , मास्क न घालणारे नागरिक, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणारे रिक्षाचालक, अनधिकृत विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर बोचरी टीका” date=”10/10/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नागपूरमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार 2 महिन्याचा पोषण आहार” date=”10/10/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार 2 महिन्याचा पोषण आहार, हरभरा, मूग डाळीसह तांदूळ मिळणार, 20 टक्के शाळेंमध्ये झाला पुरवठा, शाळा बंद असल्याने खिचडी देणे शक्य नसल्याने धान्य रुपात दिला जाणार आहार, जुलै ,ऑगस्ट महिन्याचा आहार वाटप करण्याचे निर्देश [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातही गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल” date=”10/10/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातही गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल, गेल्या दोन दिवसांपासून गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या, अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी” date=”10/10/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी, उपचाराखाली असलेले रुग्ण केवळ 471, गेल्या चौवीस तासात 56 कोरोनाबाधित रुग्ण सापडले, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.76 वर, मृत्यूदर मात्र 3.67 एवढा, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 291 वर [/svt-event]

[svt-event title=”मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर दोन वेगवेगळे अपघात, दोघांचा मृत्यू” date=”10/10/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोन जखमी, बोरघाटात अम्रुतांजन ब्रिज जवळ मुबंई लेनवर साखरेच्या पोत्याचां ट्रक पलटी, साखरेच्या पोत्याच्या ट्रकखाली दोन जण अडकले होते त्यातील एकाचा मृत्यू, दुसरा अपघात मुबंई पुणा एक्सप्रेस वे वर फुडमॉल जवळ मुबंई लेनवर झाला, या अपघातातही एकाचा मृत्यू तर एक जखमी [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन अपघात” date=”10/10/2020,11:55AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीआरपी घोटाळ्याची आता EOW ही करणार चौकशी” date=”10/10/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] टीआरपी घोटाळ्याची आता EOW ही करणार चौकशी, मुंबई पोलीस दलाचा आर्थिक गुन्हे शाखा ही करणार चौकशी, DCP पराग मणेर यांच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी, खोटा टीआरपी दाखवून चॅनेलने आर्थिक फायदा मिळवल्याचा संशय, यात आर्थिक फसवणूक झाली. या मुद्यावर होणार चौकशी [/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला” date=”10/10/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुत्रे हाती घेतली, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर याच्यां कडून अशोक दुधे यांनी पदभार स्वीकारला, दुधे यांनी नवी मुबंई पोलीस आयुक्त अतंर्गत पनवेल विभाग -2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणुन कामगिरी केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत मनसेच्या रेल रोको आंदोलनाला यश” date=”10/10/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत मनसेच्या रेल रोको आंदोलनाला यश, अखेर लोकल ऐरोली रेल्वे स्थानकावर थांबली, शाल पुष्पगुच्छ देत मोटरमन यांचे मनसेने मानले आभार, लॉकडाऊन काळात लोकल रेल्वे स्थानकावर थांबत नव्हती, मनसेने रेल्वे प्रशासनाला दिले होते निवेदन [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”10/10/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]