[svt-event title=”शरद पवारांनी सहकारी बँकांच्या प्रश्नावर बैठक बोलावली” date=”30/07/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांनी सहकारी बँकांच्या प्रश्नावर बैठक बोलावली, अकरा वाजता वाय बी चव्हाण सेंटरला बैठक, सहकारी बँकाच्या मुद्द्यावर चर्चा होणार [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाच्या भीतीनं मृतावर अंत्यसंकाराला नातेवाईकांचा नकार” date=”30/07/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या भीतीनं मृतावर अंत्यसंकाराला नातेवाईकांचा नकार, ग्रामपंचायतीमध्ये 51 वर्ष शिपाई म्हणून काम केलेल्या भूपाल परीट यांच्या वर ग्रामपंचायतीनेच केले अंत्यसंस्कार, उपसरपंच राजू मगदूम यांच्यासह सहकाऱ्यांनी पीपीई किट घालत घेतला अंत्यसंस्कारासाठी पुढाकार, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथला प्रकार [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर, स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून रवाना” date=”30/07/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ]
Uddhav Thackeray in Pune | मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर, स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून रवाना https://t.co/JD5viVpgTV pic.twitter.com/F4SdaSRs7L
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020
[svt-event title=” राज्यातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगरीची कुऱ्हाड” date=”30/07/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर येणार बेरोजगरीची कुऱ्हाड, ऐन कोरोना काळात 31 जुलैपासून सेवा समाप्तीचे काढलेत आदेश, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात राज्यातील सुमारे 1500 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत, यामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण 30 कंत्राटी कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढण्याचे आदेश देण्यात आलेत, त्यामुळे या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितले. [/svt-event]
[svt-event title=”शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची उच्च न्यायालयात धाव” date=”30/07/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची उच्च न्यायालयात धाव, पीककर्ज न देणाऱ्या बँकांच्या विरोधात हर्षवर्धन जाधव यांची याचिका, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली याचिका, पीककर्ज नाकारणाऱ्या बँका आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची जधाव यांची मागणी, राज्यात फक्त 32 टक्केच पीककर्ज वाटप केल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा दावा [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये नवीन ट्रॅक्टर खाली दाबून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू” date=”30/07/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये नवीन ट्रॅक्टर खाली दाबून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, सुरगाणा तालुक्यातील काठीपाडामध्ये घडला प्रकार, पासिंग न झालेला नवीन ट्रॅक्टर शेतात नेला असताना सुटला ताबा, 28 वर्षांच्या संजय दोडके यांचा दुर्दैवी मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच नद्यांना तुफान पूर” date=”30/07/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच नद्यांना तुफान पूर, जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आले पूर, जिल्ह्यातील सर्वच छोट्या मोठ्या नद्या झाल्या ओव्हरफ्लो, अनेक ठिकाणी नद्यांवरील पुलंही गेले वाहून, नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत [/svt-event]
[svt-event title=”सातारा जिल्ह्यात 141 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह” date=”30/07/2020,9:50AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात उशीरा 141 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, सद्यस्थितीत 1606 बाधित रुग्णांवर उपचार सुरु, गेल्या 24 तासात 9 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू तर आतापर्यंत कोरोनाबाधित मृत्यू संख्या 128, जिल्ह्यात एकूण 1933 कोरोनामुक्त, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3667 [/svt-event]
[svt-event title=”देशात कोरोना रुग्णांची संख्या 15 लाख 83 हजार 792 वर” date=”30/07/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोना रुग्णांची संख्या 15 लाख 83 हजार 792 वर, तसेच मृत्यूची संख्या 34 हजार 968, 24 तासात कोरोना संक्रमणाची संख्या 52 हजार 123, तर मृत्यूची संख्या 775 वर पोहोचली आहे, देशात बरे होणाऱ्यांची संख्या 10 लाख 20 हजार 582 वर आहे [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”30/07/2020,9:38AM” class=”svt-cd-green” ]