मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले (Lockdown 3 Liquor shop open) आहे. त्यामुळे आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. मात्र या काळात काही झोनमध्ये काही निर्बंध शिथिल करण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात गृह मंत्रालयाने दारुची दुकाने तसेच पान मसाला, गुटखा आणि तंबाखू विक्रीलाही परवानगी दिली आहे. या निर्णयावर बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री रविना टंडन यांनी संताप व्यक्त केला आहे.
दारुची दुकान सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त (Lockdown 3 Liquor shop open) केला आहे. “लॉकडाऊनदरम्यान दारुची दुकान सुरु करणे अत्यंत चुकीचे ठरेल. गेल्या काही दिवसात घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. त्यामुळे जर दारु विक्री सुरु केली तर ती महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते,” असे ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे.
Opening liquor shops during the lock down will only bring disastrous results . In any case according to all the surveys nowadays domestic Violence has increased to a large extent .liquor will make these days even more dangerous of for women and children .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 2, 2020
तर अभिनेत्री रविना टंडन यांनी पान, गुटख्याची दुकान उघण्याच्या निर्णयावर नाराजी वर्तवली आहे. “व्हा, छानचं, पान गुटख्याची दुकानं सुरु होणार, म्हणजे पुन्हा थुंकणे सुरु होईल!!”, असे रविना टंडन यांनी म्हटलं आहे.
Yaaay for paan/gutka shops! Excellent, the spitting starts again! Wonderful!! https://t.co/KRyOv7HcKT
— Raveena Tandon (@TandonRaveena) May 1, 2020
गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार ग्रीन, ऑरेंज, रेड झोनसाठी हे नियम लागू करण्यात येतील. पण रेड झोनमधील हॉटस्पॉटमध्ये या नियमांवर बंदी असणार आहे. ही सर्व दुकान उघडण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असणार आहे.
हे आहेत नियम
Lockdown3.0: What is allowed and what is prohibited, in red, orange and green zones? Here is a simple ready-reckoner for you #IndiaFightsCoronavirus #Lockdown3 #Lockdownextention pic.twitter.com/sxMOTaOXTZ
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 2, 2020
दरम्यान या व्यक्तिरिक्त ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगी असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून चालक त्यांची दुकानं उघडू शकतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे (Lockdown 3 Liquor shop open) अनिवार्य असेल.
संबंधित बातम्या :
Lockdown – 3 : ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी