मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाऊन 31 मेपर्यंत कायम (Lockdown 4 Red Zone Rules) ठेवण्यात आलं आहे. या लॉकडाऊनची नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे. कोणत्या झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद असेल, हे यामध्ये सांगण्यात आलं आहे. यानुसार महाराष्ट्राची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी केली आहे.
त्यानुसार, मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका रेड झोनमध्ये असणार आहेत. तर उर्वरित क्षेत्र हे बिगर रेड झोनमध्ये असणार आहे.
रेड झोनमध्ये उघडण्यास बंदी असलेली दुकाने, मॉल, आस्थापना केवळ स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती किंवा पावसाळ्याच्या पूर्वीच्या कामांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडता येणार आहे. मात्र निर्मिती किंवा व्यावसायिक वापरास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय कंटेंन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कंटेंन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहे.
रेड झोनमध्ये काय सुरु राहणार?
रेड झोनची नियमावली
रेड झोनमधील कंटेन्मेंट झोनचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना कंटेन्मेंट झोनविषयी निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये एखादी वसाहत, झोपडपट्टी, इमारत, मोहल्ला, इमारतींचा संकुल, गल्ली, वॉर्ड, पोलीस स्टेशनचा भाग, गाव किंवा गावाचा भाग यांचा समावेश होऊ शकतो. त्यापेक्षा मोठा विभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यापूर्वी (संपूर्ण तालुका किंवा महापालिका क्षेत्र) मुख्य सचिवांशी चर्चा करणे बंधनकारक असणार (Lockdown 4 Red Zone Rules) आहे.
संबंधित बातम्या :
Lockdown 4.0 Guidelines | महाराष्ट्रासाठी चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर