नागपूर : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे (Lockdown Effect On People). त्यामुळे देशातील जवळपास सर्व नागरिक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. मात्र, आता याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसून येत आहे. घरात राहून राहून नागरिकांमध्ये निद्रा नाशचे (Insomnia) प्रमाण वाढत आहे. तर, अनेकांना काम, नोकरी या सगळ्या चिंता भेडसावत आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी (Lockdown Effect On People) दिली आहे.
कोरोनाची भीती आणि अनेक दिवसाचे लॉकडाऊन आता सामान्य नागरिकांवर परिणाम करत आहे. लॉकडाऊन होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अशा प्रकारे एवढे दिवस नागरिकांना कधीही घरात बसावं लागलेलं नाही. एवढंच नाही तर, घराबाहेरसुद्धा निघता येत नसल्याने नागरिकांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. अनेकांना निद्रा नाशचा त्रास उद्भवला आहे. लोकांना झोप येत नाही किंवा झोप लागली (Lockdown Effect On People) तर लवकर उठत असल्याचं नागरिक सांगतात.
नागपूरकरांनो प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडल्यास थेट विलगीकरण कक्षात रवानगी, तुकाराम मुंढेंचे आदेशhttps://t.co/usvxlOjooT
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2020
तर काही लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. जीवनातील आधी केलेल्या प्लॅनिंगमध्ये कोरोना नव्हतं, त्यामुळे त्यांचं नियोजन बदललं आहे आणि त्यामुळे प्लॅनिंगचं काय?, असा प्रश्न त्यांच्या मनात येत असल्याने त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होत आहे.
या समस्यांपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावं?
नागरिकांनी यातून बाहेर पाडण्यासाठी आपलं रुटीन सेट करायला हवं. नियोजन केलं तर याचा परिणाम होणार नाही. उपलब्ध असलेल्या साधनात किंवा पैश्यात आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. या सगळ्या बाबींची काळजी घेऊन नागरिकांनी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करावं, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी (Lockdown Effect On People) दिला आहे.
संबंधित बातम्या :
संगमनेरमध्ये एकाच दिवसात 7 कोरोना रुग्ण, नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 51 वर
दारु खरेदीतही ‘लेडीज फर्स्ट’, भिवंडीत वाईन शॉपबाहेर तळीरामांकडून बायकोला रांगेत उभं करण्याचे प्रकार
आधुनिक श्रावणबाळ! 80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मालाड ते वाशिम 350 किमी प्रवास
Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला