पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यटनावर बंदी घालण्यात आली (Lonavala Police action on Tourist) आहे. असे असताना सुद्धा लोणावळा परिसरात 12 पर्यटक फिरण्यास आले होते. लोणावळा पोलिसांनी या 12 पर्यटकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यासोबत विनामास्क फिरणाऱ्या 23 जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले (Lonavala Police action on Tourist) आहेत.
लोणावळ्यात आतापर्यंत एकूण 35 लोकांकडून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यटक बंदी असताना सुद्धा पर्यटक येत असल्यामुळे लोणावळ पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
पर्यटकांनी लोणावळा फिरण्यासाठी न येण्याचे आवाहन लोणावळा पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
पावसाळा सुरु झाला की मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटक लोणावळा फिरण्यास येतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. याच दरम्यान काहीजण नियमांचे उल्लंघन करत फिरण्यास येणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत न येण्याचे आवाहन केले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी पर्यटन स्थळी पर्यटक जाऊन नये यासाठी धरण आणि लायन पॉईंट येथे चेकपोस्ट लावले आहेत.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत 2 लाख 6 हजार 619 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
टोकदार काट्यावर पाठ टेकवली, झोळी भरुन दक्षिणा घेतली, पुण्यात कथित बाबासह 40 जणांवर गुन्हे दाखल