नागपूर : राज्यात अनेक पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून शेतकऱ्यांना लूटण्याचे प्रकार समोर येत आहेत. सोयाबीन पिकासाठी शासनाने ठरवून दिलेला हमीभाव हा 3880 आहे. पण भिवापूरच्या बाजारात सोयाबीनला फक्त 2800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून शेतऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. तसा आरोप भिवापूरच्या शेतकऱ्यांनी केला आहे. (in Nagpur Soyabin is purchased below the guaranteed price fixed by the government)
भिवापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत लूट
भिवापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सोयाबीनला 2800 रुपये प्रति क्विंटल दर दिला जातोय. शासनाने सोयाबीनला 3880 रुपये हमीभाव ठरवून दिलेला आहे. पण प्रत्यक्षात मात्र, व्यापारी सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने करत आहेत. त्यामुळे क्विंटलमागे जवळपास 1000 रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
हेही वाचा : देशात वर्षभरात 10 हजार 281 शेतकरी आत्महत्या, दुर्देवाने महाराष्ट्राचा क्रमांक पहिला
शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की, विदर्भात आधीच 80 टक्के सोयाबीनचं नुकसान झालं आहे. जे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे, त्यालाही भाव मिळत नाहीये. केंद्र सरकारनं सोयाबीनसाठी 3880 रुपये हमीभाव ठरवून दिला आहे. पण, विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सोयाबीनला 2800 रुपये प्रति क्विंटलपासून दर मिळतोय. म्हणजे प्रति क्विंटल, साधरण 1000 रुपयांची शेतकऱ्यांची लूट होत आहे.’ उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यात त्यांनाही शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं आढळलं आहे. त्यांनी शेतीमालाची खरेदी हमीभावानेच झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नापिकी, कर्ज, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढत आहेत. 2018 मध्येदेखील शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र सर्वात पुढे होता. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2018 या एकाच वर्षात तब्बल 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी होऊनही, महाराष्ट्रात तब्बल 3 हजार 594 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. महत्त्वाचं म्हणजे बिहारसारख्या राज्यात या वर्षात एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही.
संबंधित बातम्या :
Prakash Javadekar | ऊसाला आता प्रतिटन 2850 रुपये हमीभाव : प्रकाश जावडेकर
(in Nagpur Soyabin is purchased below the guaranteed price fixed by the government)