नागपूर : पुढील पाच दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता नसून तुरळक पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला (Rain update in Vidarbha) आहे. पावसाचे प्रमाण टक्केवारी समाधानकारक असल्याने शेती पिकाच्या दृष्टीने सुरू असलेला रिमझिम पाऊस फार महत्वाचा मनाला जातो (Rain update in Vidarbha) आहे.
यावर्षी महाराष्ट्रात सर्वात आधी मान्सूनचे आगमन विदर्भात झाले. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग काहीसा मंदावलेला असला तरी गेल्या संपूर्ण महिनाभरात विदर्भात सरासरी शंभर टक्के पाऊस झाला आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरीही भात शेतीचा पट्टा समजला जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मात्र पावसाने दगा दिलेला आहे.
गोंदियामध्ये सामान्य पेक्षा 29 टक्के पाऊस कमी झाला आहे. एका महिन्यात गोंदियामध्ये 311 मिलिमीटर पाऊस व्हायला हवा होता. परंतु प्रत्यक्षात 221 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी सुद्धा या काळात 25 टक्के पाऊस कमी झाला होत अशी नोंद आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
त्याशिवाय इतर जिल्ह्यांमध्ये महिनाभरात झालेल्या पावसाचे प्रमाण चांगले आहे. विदर्भातील इतर जिल्हे ज्यामध्ये वर्धा गडचिरोली, भंडारा,चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 90 ते 95 टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.
दरम्यान, विदर्भात झालेल्या चांगल्या पावसामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन पिकाला चांगला फायदा होईल. पावसामुळे पिकांची वाढ जोमाने होईल. त्यासोबतच भूगर्भातील पाणीही वाढणार आहे. याचा मोठा फायदा होईल. समाधानकारक पावसामुळे विदर्भातील शेतकरी सुखावला आहे.
संबंधित बातम्या :
Rain Updates | कोकण, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस
Rain Update | विदर्भात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला