मुंबई : दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनी पुन्हा एकदा चित्रपट निर्माता करण जोहरवर (Karan Johar) निशाणा साधला आहे. अलीकडेच आपल्या चित्रपटाचे शीर्षक कारण जोहरने चोरल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता मधुर भांडारकर यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसला देखील करण जोहरकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘या प्रकरणी करण जोहर याला बर्याच वेळा नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत. परंतु, असे असूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नाही’, असे मधुर भांडारकर यांनी म्हटले आहे (Madhur Bhandarkar Allegation on Karan Johar).
शीर्षक चोरी प्रकरणी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी आज (26 नोव्हेंबर) पुन्हा एकदा ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले की, ’19 नोव्हेंबरपासून धर्मा मुव्हीजला अनेक नोटीसा पाठविल्या गेल्या आहेत. त्यापैकी दोन आयएमपीए, एक आयएफटीडीए आणि दोन नोटीस एफडब्ल्यूईसीने पाठवल्या आहेत. या सर्व नोटिसा ‘बॉलिवूड वाईफ्स’ या चित्रपटाचे शीर्षक हस्तगत केल्याबद्दल पाठविल्या गेल्या आहेत. परंतु, यापैकी कोणत्याही नोटिसांवर धर्मा प्रोडक्शनने अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिले नाही.’
शीर्षक चोरी प्रकरणानंतर करण जोहरला सोशल मीडियावरही ट्रोल केले गेले होते. त्याचा शो ‘कॉफी विथ करण’वर बंदी घालण्याची मागणीही केली जात होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे चाहते करण जोहरवर आधीच खूप चिडले होते. अशा परिस्थितीत मधुर भांडारकर यांच्या या आरोपांनंतर करण जोहरला ट्रोल करण्याची त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
Notices send to @DharmaMovies since 19th Nov, 2 from (IMPPA) ,1 (IFTDA)& 2 Notices of (FWICE )all r Official Bodies of the Film Industry, on misusing & tweaking of my Film Title #BollywoodWives…there is NO official response yet to any of the above Associations from Dharma. https://t.co/QBZyMWxXDG pic.twitter.com/zEfndEoATZ
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) November 26, 2020
काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींवर आधारित वेब रिअॅलिटी शो ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’चा ट्रेलर प्रदर्शित केला होता. आता या कार्यक्रमामुळे चित्रपट निर्माते मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) संतप्त झाले आहेत. ‘बॉलिवूड वाईफ्स’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, त्यांनी ते करण जोहरला (Karan Johar) देण्यास नकार दिल्याचा दावा, मधुर भांडारकर यांनी केला आहे. मधुर यांनी शोचे निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता यांना त्यांच्या या कार्यक्रमाचे शीर्षक बदलण्याची विनंती केली आहे (Madhur Bhandarkar Allegation on Karan Johar).
या बरोबरच त्यांची करण जोहरवर थेट शीर्षक चोरीचा आरोप केला आहे. मागूनही देत नाही म्हटल्यावर करणने थेट नाव प्रदर्शित केले, असे मधुर भांडारकर यांनी म्हटले होते. या संदर्भात चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
मधुर भांडारकर यांनी याबद्दल ट्विट करत करण जोहरने हे शीर्षक बदलावे, अशी मागणी केली होती. ‘प्रिय करण जोहर, तू आणि अपूर्व मेहता यांनी मला वेब शोसाठी ‘बॉलिवूड वाईफ्स’ हे नाव मागितले होते. मी त्याला नकार दिला होता, कारण माझा त्याच नावाचा प्रोजेक्ट सुरू आहे. तरीही आपण आपण ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ हे नाव वापरलेत, जे नैतिक आणि सैद्धांतिकदृष्ट्या चुकीचे आहे. कृपया, माझा प्रोजेक्ट खराब करू नका. या शोचे शीर्षक बदलण्यासाठी मी नम्रपणे विनंती करतोय’, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
(Madhur Bhandarkar Allegation on Karan Johar)
Madhur Bhandarkar | नकारानंतरही शीर्षकाची कॉपी, मधुर भांडारकर करण जोहरवर भडकले!https://t.co/BP8zGPLYXo@imbhandarkar @karanjohar @apoorvamehta18 #TheFabulousLivesOfBollywoodWives
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020