मुंबई: गेल्या वर्षभरापासून देशभरात मी टू (Me Too) मोहिमेने बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रात खळबळ उडवून दिली. लेखिका, दिग्दर्शक विंता नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणासह बलात्काराचा आरोप केला होता. याशिवाय ‘गुलाब गँग’ चे दिग्दर्शक सौमिक सेन यांच्यावरही तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या दोन्ही कलाकारांसोबत धक धक गर्ल, अभिनेत्री माधुरी दीक्षितने काम केलं होतं.
नुकतंच पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माधुरीला या दोन्ही कलाकारांचं नाव #MeToo मध्ये आल्याने दु:ख झालं का, असं विचारण्यात आलं. त्यावर माधुरीने दोन गोष्टी सांगितल्या. माधुरी म्हणाली, अशा गोष्टी हैराण करणाऱ्या असतात. कारण तुम्ही त्यांना ओळखता, मात्र अशा पद्धतीने त्यांची ओळख नसते. दुसरं म्हणजे, माझ्यासाठी ही अत्यंत धक्कादायक बाब होती. मला त्यांची असलेली ओळख आणि मी त्यांच्याबाबत जे वाचत होते, ऐकत होते, त्यावरुन वाटतं की या दोन वेगळ्या व्यक्ती होत्या.
माधुरीची ‘टोटल धमाल’
दरम्यान, माधुरी दीक्षित आगामी टोटल धमाल या सिनेमात झळकाणार आहे. या सिनेमात अभिनेते अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एका गुजराती दाम्पत्याची भूमिका साकारत आहे. या दोघांशिवाय अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी हे सुद्धा लीड रोलमध्ये आहेत. धमाल सिनेमाचा तिसरा भाग म्हणजे ‘टोटल धमाल’ असून इंद्र कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 22 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
टोटल धमाल या सिनेमानंतर माधुरी दीक्षित करण जोहरच्या ‘कलंक’ या सिनेमात दिसणार आहे. माधुरीसोबत या सिनेमात संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर झळकणार आहे.
Another dose of Dhamaal coming to you in the form of our 1st song. #PaisaYehPaisa out today at 2PM.@ADFFilms @Indra_kumar_9 @foxstarhindi @saregamaglobal pic.twitter.com/obu4uGroyF
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) January 29, 2019