भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा लांबणीवर पडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत ‘विश्वासमत’ ऐवजी आमदारांची ‘कोरोना’ चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यातच विधानसभा सचिवालयाने रविवारी रात्री जारी केलेल्या कामकाज पत्रिकेत (एलओबी) विश्वासदर्शक प्रस्तावाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Madhya Pradesh Floor Test Postpone)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाज पत्रिकेत राज्यपालांचे अभिभाषण आणि आभार प्रस्ताव या दोन गोष्टींचाच उल्लेख आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अग्निपरीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘तुम्हाला सोमवारीच याचा उलगडा होईल’ अशी संदिग्ध प्रतिक्रिया मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी दिली.
राज्यपाल लालजी टंडन यांच्या आदेशानुसार हात उंचावून बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. ‘विधानसभेच्या सभागृहातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा काम करत नसल्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात यावे,’ अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते गोपाल भार्गव यांनी केली.
दरम्यान, मध्य प्रदेशातील 22 आमदारांनी राजीनामा सादर केला असला, तरी सहा जणांचे राजीनामेच मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ 222 वर पोहचलं आहे, तर बहुमताचा आकडा 112 आहे. विरोधीपक्षातील भाजपकडे 107 आमदारांची ताकद आहे. काँग्रेसचं संख्याबळ (114 + 7 – 22 = 99) वर पोहोचलं आहे. (Madhya Pradesh Floor Test Postpone)
गुजरात काँग्रेसमध्ये भूकंप, चार आमदारांच्या राजीनाम्याने राज्यसभेच्या जागेला हादरा
राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विश्वासमताला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. ‘मी राज्यपालांना सांगितले आहे की मी फ्लोअर टेस्टसाठी तयार आहे. ज्या आमदारांना बंदिस्त करण्यात आले आहे त्यांची सुटका करावी. मी उद्या त्याविषयी सभापतींशी बोलणार आहे’ अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली होती.
ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने विधानसभेत बहुमत गमावले आहे, असा दावा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला. राज्यातील काँग्रेसशासित सरकार फ्लोअर टेस्टपासून दूर पळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath after meeting Governor Lalji Tandon: I have told Governor that I am ready for the floor test and the MLAs who have been held captive should be released. I will speak to the Speaker tomorrow about it (floor test). https://t.co/t5OkIdW9Ub
— ANI (@ANI) March 15, 2020
Madhya Pradesh Floor Test Postpone