रायगड : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तारिक गार्डन ही पाच मजली इमारत 24 ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेला 40 तास उलटल्यानंतर हे शोध कार्य संपलं. या दुर्घटनेतील बचावकार्याला गती देण्यासाठी माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे एका रिअल हिरोने तब्बल 26 तास पोकलेन चालवलं आहे. किशोर भागवत लोखंडे (24) असे या व्यक्तीचे नाव आहे. (Mahad Building Collapse Kishor lokhande Real hero during Rescue operation)
किशोर लोखंडे हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी या ठिकाणी राहतो. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, विविध स्वयंसेवी संस्थांनी बचावकार्यात पुढाकार घेतला.
या बचावकार्यात गती यावी यासाठी किशोरने तब्बल 26 तास अविरतपणे पोकलेन चालवलं. या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले. त्यामुळे महाड दुर्घटनेनतंर शोधकार्यात तो खरा रिअल हिरो ठरला. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. या इमारतीत 41 कुटुंब राहत होते.
पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात आला. बचाव कार्यात साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फार्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांचा मोलाचा वाटा आहे.
मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येतील. जखमींना पन्नास हजार रुपयांची दिले जाणार. या घटनेत ज्यांनी आपलं घर गमावलं आहेत त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत काल सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे
इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला सारायला अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच खरी परिस्थिती कळेल, असे सांगण्यात येत आहे. (Mahad Building Collapse Kishor lokhande Real hero during Rescue operation)
संबंधित बातम्या :
Mahad Building Collapse | 36 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरु, मृतांचा आकडा वाढता
महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा