महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान

| Updated on: Oct 21, 2019 | 4:38 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान
Follow us on

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांची वाढलेली धाकधूक शिगेला पोहचली असून 3 हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे.

[svt-event title=”नाना पाटेकर यांचं मतदान” date=”21/10/2019,2:44PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”स्मृती इराणी यांचं मतदान” date=”21/10/2019,2:34PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जयंत पाटील यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,12:46PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उर्मिला मातोंडकरचं मतदान” date=”21/10/2019,12:43PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”धनंजय मुंडे यांचं मतदान” date=”21/10/2019,12:24PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सचिन तेंडुलकरचं पत्नी-मुलांसह मतदान” date=”21/10/2019,12:23PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राणे कुटुंबाचं मतदान” date=”21/10/2019,12:23PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उद्धव ठाकरे सहकुटुंब रांगेत” date=”21/10/2019,12:22PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ठाकरे कुटुंबाचं मतदान” date=”21/10/2019,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मतदानानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया” date=”21/10/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अशोक चव्हाणांचं मतदान” date=”21/10/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”करमाळ्यात मतदानाला गालबोट” date=”21/10/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज ठाकरे यांचं मतदान” date=”21/10/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायकाला” date=”21/10/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर” date=”21/10/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”माधुरी दीक्षितचं मतदान” date=”21/10/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांचं मतदान” date=”21/10/2019,10:46AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बाळासाहेब थोरातांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,10:45AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”यवतमाळचे उत्साही मतदार” date=”21/10/2019,10:39AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला” date=”21/10/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी” date=”21/10/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मी उमेदवार नसल्याने धाकधूक कमी : खडसे” date=”21/10/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”एकनाथ खडसे मतदानासाठी रांगेत” date=”21/10/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”लारा दत्ता-महेश भूपतीचं मतदान” date=”21/10/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आमीर खानचं मतदान” date=”21/10/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अमरावतीत ‘स्वाभिमानी’च्या उमेदवाराची गाडी जाळली” date=”21/10/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]
[svt-event title=”सकाळी 9 वाजेपर्यंत कुठे किती टक्के मतदान?” date=”21/10/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शरद पवार यांचं मतदान” date=”21/10/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”लातूरकरांचा उत्तम प्रतिसाद : जेनेलिया देशमुख” date=”21/10/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नंदुरबारमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान” date=”21/10/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जेनेलिया देशमुख यांचं लातूरमध्ये मतदान” date=”21/10/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जानकरांचं मातोश्रींसह मतदान” date=”21/10/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उदयनराजे यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मतदानानंतर संपूर्ण पवार कुटुंब” date=”21/10/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”गिरीश महाजन सहकुुटुंब मतदानाला” date=”21/10/2019,9:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”किरीट सोमय्या सहकुटुंब मतदानाला” date=”21/10/2019,9:01AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरु” date=”21/10/2019,8:59AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”प्रफुल्ल पटेल मतदानाला” date=”21/10/2019,8:55AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”किशोरी शहाणेंचं मतदान” date=”21/10/2019,8:54AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”प्रशांत दामले यांचं मतदान” date=”21/10/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील मतदानाला” date=”21/10/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आमचंच सरकार येणार : सुप्रिया सुळे” date=”21/10/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नितीन गडकरींचं मतदान” date=”21/10/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सुप्रिया सुळे मतदानाला” date=”21/10/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”गडचिरोलीत सखी मतदान केंद्र ” date=”21/10/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”रावसाहेब दानवे यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,7:55AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”शिवेंद्रराजे भोसले यांचं औक्षण” date=”21/10/2019,7:50AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”सांगलीतील इस्लामपूरमध्ये मतदानयंत्रात बिघाड” date=”21/10/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदान केंद्रावर मतदानयंत्रात बिघाड, इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक 63 वर मतदान यंत्रात बिघाड, 35 मिनिटे उलटूनही मतदान सुरु नाही [/svt-event]

[svt-event title=”अभिनेते अतुल कुलकर्णी सपत्नीक मतदानाला” date=”21/10/2019,7:40AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”धनंजय मुंडेंच्या नावे व्हायरल क्लिप तपासा : अजित पवार” date=”21/10/2019,7:14AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मतदारांनी योग्य पक्ष निवडावा : उदयनराजे ” date=”21/10/2019,7:10AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”‘नोटा’वर आमचा विश्वास नाही : मोहन भागवत” date=”21/10/2019,7:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आशिष शेलार यांचं मतदान” date=”21/10/2019,7:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीतून ट्वीट, मतदानाचं आवाहन” date=”21/10/2019,7:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मतदानाला सुरुवात” date=”21/10/2019,7:00AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अजित पवार मतदानासाठी रवाना” date=”21/10/2019,6:56AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उदयनराजे योग्य पक्षात, मातोश्रींची प्रतिक्रिया” date=”21/10/2019,6:52AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उदयनराजे भवानीमातेच्या दर्शनेला” date=”21/10/2019,6:52AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मतदानाला अवघ्या काही मिनिटांत सुरुवात” date=”21/10/2019,6:00AM” class=”svt-cd-green” ] राज्यभरातील 288 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरु होण्यास अवघा एक तास बाकी आहे. [/svt-event]

राज्यभरात सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंतच मतदान होईल

ऑक्टोबर 2014 मध्ये अस्तित्वात आलेल्या 13 व्या विधानसभेचा कालावधी 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपणार आहे. गेल्या 50 वर्षात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना-शिवसंग्राम यांची महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडी-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना-समाजवादी पक्ष यांची महाआघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यासारख्या पक्षांच्या दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

21 सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यभर चार आठवडे प्रचाराचा धुरळा उडाला. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभांचा धडाका लावला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह हेसुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यभर दौरे घेत प्रचाराचा झंझावात केला. शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असल्याचं दाखवून दिलं. सोबतच सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्या सभांचा नजराणा होताच. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी बाजू सावरून धरली, तरी राहुल गांधी यांच्या दोन सभा वगळता गांधी घराण्याची अनुपस्थिती जाणवत राहिली.

हेही वाचा : विधानसभा निवडणूक : मतदानासाठी मुंबई सज्ज, बंदोबस्तासाठी 40 हजार पोलीस तैनात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणाने मैदान गाजवलं. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सर्वांवर राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. तर एमआयएम प्रमुख असदुद्दिन ओवेसी, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांनीही लोकसभा निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद पाहून सत्ता खेचून आणण्यासाठी यथोचित प्रयत्न केले. आप स्वबळावर मैदानात उतरली असली, तरी पक्षाध्यक्ष मात्र महाराष्ट्रात सभा घेताना दिसले नाहीत.

प्रचारादरम्यान कुठे परस्परविरोधी उमेदवारांनी एकमेकांना मत देण्याचं खेळीमेळीत आवाहन झालं, तर कुठे समर्थक एकमेकांना भिडून राडेबाजी झाली. काही दिग्गज नेत्यांनी जीभ सैल सोडल्यामुळे प्रचाराने खालची पातळी गाठली. पैलवान, टोपणनावं ही प्रचाराची थीम होती, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. निवडणुकांच्या तोंडावर विक्रमी राजकीय पक्षबदल झाल्यामुळे उमेदवारांची पळवापळवी पाहायला मिळाली. सोबत नाराजांनी डोकं वर काढल्यामुळे बंडखोरीही मोठ्या प्रमाणावर झाली.

हेही वाचा : मतदारांची संख्या, मतदान केंद्र ते ओळखपत्र, निवडणुकीची A टू Z माहिती

पक्षनिहाय उमेदवार

बसप – 262
भाजप – 164
काँग्रेस – 147
शिवसेना – 126
राष्ट्रवादी – 121
मनसे – 101
भाकप – 16
माकप – 8
इतर पक्ष – 892
अपक्ष – 1400

महत्त्वाचे उमेदवार

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आदित्य ठाकरे, अजित पवार, रोहित पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, राम शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, प्रणिती शिंदे, नितेश राणे, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन,

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

• भाजप – 122
• शिवसेना – 63
• काँग्रेस – 42
• राष्ट्रवादी – 41
• बविआ – 03
• शेकाप – 03
• एमआयएम – 02
• वंचित/भारिप – 01
• माकप – 01
• मनसे – 01
• रासप – 01
• सपा – 01
• अपक्ष – 07
• एकूण – 288

सर्वात जास्त उमेदवार असलेला मतदारसंघ – नांदेड दक्षिण (38)

सर्वात कमी उमेदवार असलेला मतदारसंघ – चिपळूण (3)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान मतदारसंघ – धारावी (मुंबई)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ – अहेरी (गडचिरोली)

लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान मतदारसंघ – वर्धा (2 लाख 77 हजार 980 मतदार)

लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ – पनवेल (5 लाख 54 हजार 827 मतदार)

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

• मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.

• भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

1. पासपोर्ट (पारपत्र)

2. वाहन चालक परवाना

3 छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

4. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक

5. पॅनकार्ड

6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

7. मनरेगा जॉबकार्ड

8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

10. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11. आधारकार्ड

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

• मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध
• या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

एकूण मतदार

• महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.
•पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार 750
•महिला मतदार – 4 कोटी 28 लाख 43 हजार 635
•तृतीयपंथी मतदार – 2 हजार 634

यापैकी

•दिव्यांग मतदार – 3 लाख 96 हजार
•अनिवासी भारतीय – 5560
•निवडणूक सेवेतील मतदार- 1 लाख 17 हजार 581

मतदारांचा वयोगट

18 ते 25 – 1,06,76,013
25 ते 40 – 3,13,13,396
40 ते 60 – 3,25,39,026
60 पेक्षा जास्त – 1,51,93,584

मतदान केंद्रे

मतदान केंद्रे – 96 हजार 661
मुख्य मतदान केंद्रे – 95, 473
सहायक मतदान केंद्रे – 1,188
सखी मतदान केंद्रे – 352. महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण आणि व्यवस्थापनावर भर

मतदान यंत्र (ईव्हीएम) – 1 लाख 79 हजार 895
नियंत्रण केंद्रे (कंट्रोल युनिट) – 1 लाख 26 हजार 505
व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे – 1 लाख 35 हजार 21

उमेदवार

उमेदवार – 3 हजार 237
पुरुष उमेदवार – 3001
महिला उमेदवार – 235
तृतीयपंथी उमेदवार – 1

विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांततेत, निर्भयपणे आणि पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

मतदारांसाठी सोई-सुविधा

• किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा
• दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदवणे यासाठी PwD ॲपची सुविधा
• सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था
• दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था.
• अंध मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.
• लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था
• ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीसाठी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत.
• पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी लिफ्टची व्यवस्था

मतदारांच्या सुविधेसाठी

• आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.
• ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणासाठी GPS Tracking App,
• मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-1950.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
• मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ही सुरु.
• दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.

यंत्रणा सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे.

संबंधित इंटरेस्टिंग बातम्या :

विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्रातील 40 लक्षवेधी लढती

विधानसभेसाठी तळ्यातून मळ्यात, तिकीट मिळालेले आयाराम गयाराम

बागडेंना विक्रम रचण्यास मदत, ‘हे’ आहेत पाच वर्षांत राजीनामा दिलेले 30 आमदार

भाजपचे 22, शिवसेनेचे 8, ‘हे’ आहेत पत्ता कट झालेले 36 विद्यमान आमदार

नातेवाईक vs नातेवाईक | कुठे सख्खे भाऊ, कुठे काका-पुतणे रिंगणात

नवे आहेत पण छावे आहेत, राजकीय घराण्यांची युवा पिढी मैदानात

विधानसभेची आयपीएलसारखी स्थिती, उमेदवार तोच, फक्त पक्ष वेगळा!