maharashtra budget 2024-25 : अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार – अजित पवारांची घोषणा

| Updated on: Feb 27, 2024 | 3:19 PM

राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर ( जम्मू-काश्मीर) आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. आजच्या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या.

maharashtra budget 2024-25  : अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार - अजित पवारांची घोषणा
Follow us on

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर ( जम्मू-काश्मीर) आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत. या जागांसाठी 77 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले. तसेच कोकण विभागात पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गड-किल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी नमूद केलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं.

यावेळी त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यातील 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा  :

– ⁠सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार

– प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत 300 युनिटपर्यंत वीज मोफत

– नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतूद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले.

– वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.

– राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार

– महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार

– हर घर हर नल योजनेअंतर्गत 1 कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट

– मिहान प्रकल्पासाठी 10 कोटींचा निधी दिला.

– नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार

– लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार

– संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.

– निर्यात वाढवण्यासाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येत आहे.