गडचिरोली : गडचिरोतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा परिसरात काल नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात C-60 दलाचे 15 जवान शहीद झाले. या सर्व शहिदांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत दाखल होत, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
गडचिरोलीत काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर आज मुख्यमंत्री स्वत: गडचिरोलीत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पोलिस मुख्यालयात शहीद जवानांना मानवंदना दिली आणि श्रद्धांजली वाहिली. त्याशिवाय शहीद जवानांच्या कुटुंबाला भेट देत त्यांचं सांत्वनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to the security personnel who lost their lives in the IED blast attack by Naxals in Gadchiroli, yesterday. pic.twitter.com/gxr8HsW8Ru
— ANI (@ANI) May 2, 2019
”गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. या हल्ल्याचा प्रत्युत्तरही नक्षलवाद्यांना दिलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. तसेच या शहीद जवानांच्या परिवाराच्या पाठीशी सरकार कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं”.
शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाख
दरम्यान, गडचिरोलीतील शहीद जवानांच्या वारसांना 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकार याबाबतची घोषणा करणार आहे. तसंच शहीद जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि निवृत्तीच्या कालावधीपर्यंत पगार देण्यात येणार आहे.
हल्ला नेमका कुठे झाला?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा आणि लेंढारी गावादरम्यान बुधवारी 1 मे रोजी ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. काल नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.
Maharashtra: Wreath laying ceremony of the security personnel who lost their lives in the IED blast attack by Naxals in Gadchiroli, yesterday. pic.twitter.com/BYDYAbX4DJ
— ANI (@ANI) May 2, 2019
गडचिरोली येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्यात 15 जवान शहीद झाले. तर 1 ड्रायव्हरचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर कुरखेडा तालुक्यातून पुरडा येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी सध्या कोबिंग अँड सर्च ऑपरेशन सुरु आहे. तसंच अँटी माईल वेहिकलचा वापर करत या ठिकाणी अजून भुसुरुंग पेरले आहेत का याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष केले. यात 15 जवान शहीद झालेत. या सर्व शहीद जवानांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सध्या या शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरु आहेत.
संबंधित बातम्या:
जवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला?
गडचिरोली हल्ला : जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु
गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण
गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश
जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले
नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक
गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?
गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?
आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!