Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर, मुंबईत 17,671 रुग्ण

| Updated on: May 15, 2020 | 10:47 PM

आज राज्यात आणखी 1 हजार 576 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 29 हजार 100 वर पोहोचला आहे.

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर, मुंबईत 17,671 रुग्ण
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Maharashtra Corona Cases) आहे. आज राज्यात आणखी 1 हजार 576 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 29 हजार 100 वर पोहोचला आहे. तर राज्यात आज 505 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 6 हजार 564 रुग्ण (Maharashtra Corona Cases) बरे झाले आहेत.

दिवसभरात 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

आज राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या आता 1068 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 34, पुण्यात 6, अकोला शहरातील 2, कल्याण डोंबिवलीतील 2, धुळ्यात 2, पनवेलमधील 1 जळगावातील 1 आणि औरंगाबादेतील एकाचा समावेश आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 29 पुरुष तर 20 महिला आहेत. आज झालेल्या 49 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 22 रुग्ण आहेत. तर 23 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 49 रुग्णांपैकी 32 जणांमध्ये (65 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे (Maharashtra Corona Cases) आजार आढळले आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3567 वर

पुणे जिल्ह्यात आज 141 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या 3,107 वर पोहोचली आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या 184 वर पोहोचली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 3567 वर पोहोचली आहे. तर पुणे जिल्ह्यातील आतापर्यंत 186 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 17,671 वर

आज मुंबईत नव्या 933 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 671 वर पोहोचली. तर आज मुंबईत 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 655 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Cases

संबंधित बातम्या :

Lockdown 4 | लॉकडाऊन 4 बाबत नियम काय असू शकतात? राजेश टोपे म्हणतात…..

धारावीत तब्बल 31000 जण होम क्वारंटाईन, आठ दिवसात 412 पॉझिटिव्ह, दिवसभरात चौघांचा मृत्यू

Pune Corona | पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पार

Lockdown Extension | मुंबईतील लॉकडाऊन लवकर उठणार नाही : राजेश टोपे