Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर, एका दिवसात 18 बळी

| Updated on: Apr 22, 2020 | 8:20 PM

राज्यात आज नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचली (Maharashtra Corona Update) आहे.

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर, एका दिवसात 18 बळी
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली (Maharashtra Corona Update) आहे. राज्यात आज नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 683 वर पोहोचला आहे. तर पुणे शहर आणि ग्रामीण भागात एकूण 753 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

तर दुसरीकडे आज राज्यात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला (Maharashtra Corona Update) आहे. यात मुंबईत 10, पुणे 2, औरंगाबाद 2 तर कल्याण डोंबिवली, सोलापूर, जळगाव आणि मालेगावात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 14 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. यात 18 पैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूंची संख्या 269 वर पोहोचली आहे.

?राज्यातील एकूण कोरोना रुग्ण – 5649
?आज नवे रुग्ण – 431
?आज मृत्यू – 18 (एकूण 269)
?आज डिस्चार्ज मिळालेले रुग्ण – 67 (एकूण 789)
?मुंबईतील एकूण रुग्ण – 3683
?पुण्यातील एकूण रुग्ण (शहर+ग्रामीण) – 753 (आतापर्यंत मृत्यू- 54)

राज्यातील 722 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या 722 जणांपैकी सर्वाधिक 441 पुरुष आहे, तर 281 या महिला आहेत. त्यामध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्णांचा समावेश आहे.

त्या खालोखाल 21 ते 30 वयोगटातील 160 रुग्ण बरे झाले आहेत. तर 98 रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 91 ते 100 वयोगटातील एका तरुणानेही कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक 374 रुग्णसंख्या मुंबईची आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात 120 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांची अपडेट आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861