मुंबई : देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आधी भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येने चीनमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला पिछाडीवर सोडलं होतं. आता एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने चिंता वाढली आहे. (Maharashtra COVID Patients surpasses China Total Corona Positive Patients)
महाराष्ट्रात कालच्या दिवसात (रविवार 7 जून) 3007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 85 हजार 975 वर गेला आहे. यापैकी 39 हजार 314 रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 43 हजार 591 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
चीनमध्ये आतापर्यंत एकूण 83,040 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा संपूर्ण चीन देशातील कोरोना रुग्णांपेक्षा जास्त झाला आहे.
हेही वाचा : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनच्या दुप्पट, बळींचा आकडाही जास्त
देशात एका दिवसातील रुग्णसंख्यावाढ नवनवे उच्चांक गाठत असल्याने चिंता वाढली आहे. आज सकाळी (सोमवार 8 जून) 9 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात भारतात 9 हजार 983 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. गेल्या 24 तासात 206 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 2 लाख 56 हजार 611 वर गेला आहे. यामध्ये 1 लाख 25 हजार 381 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जवळपास तितकेच म्हणजे 1 लाख 24 हजार 095 जण कोरोनामुक्त झाले आहेत, ही दिलासादायक बाब. तर आतापर्यंत 7 हजार 135 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
India reports the highest single-day spike of 9983 new #COVID19 cases; 206 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 256611, including 125381 active cases, 124095 cured/discharged/migrated and 7135 deaths: Ministry of Health and Family Welfare (Maharashtra COVID Patients surpasses China Total Corona Positive Patients)pic.twitter.com/2PPinHr32A
— ANI (@ANI) June 8, 2020
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत चीन मागे-मागे जाण्याची करामत करत आहे. तर भारत सहाव्या स्थानावर झेपावला आहे. भारताने कोरोनाबळींमध्ये चीनलाही मागे टाकलं आहे. गेल्या काही दिवसात भारताने इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की आणि इराण या देशांना मागे टाकले.
भारताच्या पुढे असलेल्या (पाचव्या स्थानावर) यूकेमध्ये 2 लाख 86 हजार 194 रुग्ण आहेत. तर चौथ्या क्रमांकावरील स्पेनमध्ये 2 लाख 88 हजार 630 रुग्ण सापडले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या काही दिवसात त्यांच्यापेक्षा जास्त होण्याची भीती वर्तवली जात आहे.
संबंधित बातमी : कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर, 24 तासात 6977 नवे रुग्ण
सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेली अमेरिका (20 लाखाहून अधिक), ब्राझील (6 लाख 91 हजार 962) तर रशिया (4 लाख 67 हजार 673) अशी आकडेवारी आहे.
स्रोत : https://www.worldometers.info/coronavirus/
(Maharashtra COVID Patients surpasses China Total Corona Positive Patients)