मुंबई : राज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र शाळा-कॉलेज हे अद्याप बंद राहणार आहेत.(Maharashtra Unlock 4 Guidelines issue)
राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे. तसेच जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही. तसेच हॉटेल आणि लॉजही सुरु करण्यात येणार असून मेट्रो आणि सिनेमागृह अद्याप बंद राहणार आहेत.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (1/3)#MissionBeginAgain pic.twitter.com/2tgFa8poco
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2020
‘अनलॉक-4’ मध्ये राज्यात काय सुरु-काय बंद? (Maharashtra Unlock 4 Guidelines issue)
शाळा, कॉलेज तसेच इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लास 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्याशिवाय सिनेमागृह, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरिअम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही पुढील काळापर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. मेट्रो ट्रेनही बंद ठेवल्या जातील.
तर 2 सप्टेंबरपासून अनावश्यक दुकानं सुरु राहतील. तसेच दारुची दुकानेही सुरु राहणार आहे. हॉटेल आणि लॉज हे 100 टक्के क्षमतेद्वारे सुरु करता येणार आहे.
त्याशिवाय मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. त्याशिवाय जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही. (Maharashtra Unlock 4 Guidelines issue)
संबंधित बातम्या :
Unlock 4 | केंद्राकडून गाईडलाईन्स जारी, मेट्रोला हिरवा कंदील, शाळा-कॉलेज मात्र बंद
Unlock 4 | ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार