मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा

| Updated on: Aug 16, 2020 | 7:16 PM

उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाचा जोर जास्त राहणार असल्याची शक्यताही वर्तवली आहे. (Maharashtra Heavy Rainfall In next 3 days)

मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा
Follow us on

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यात पुढील आठवड्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटचे निवृत्त शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली. उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाचा जोर जास्त राहणार असल्याची शक्यताही वर्तवली आहे. (Maharashtra Heavy Rainfall In next 3 days)

जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील आठवड्यात सर्वदूर जोरदार पाऊस आहे. मुंबईसह पुणे, कोकण, कोल्हापूर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

तर 17, 18 आणि 19 ऑगस्ट हे तीन दिवस पावसाचा जोर जास्त राहणार आहे. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबईत साधारण 100 मिमी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्याशिवाय विदर्भात 17, 18 आणि 19 तारखेला पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मराठवाड्यातही पुढील आठवडाभर पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा 40 ते 60 मिलीमीटर पाऊस पडणार आहे.

दरम्यान येत्या 20 आणि 21 ऑगस्टपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल. त्याशिवाय राज्यातील धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली आहे. (Maharashtra Heavy Rainfall In next 3 days)

संबंधित बातम्या : 

विरारच्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले, जीवरक्षकाशीच हुज्जत

बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी