Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला, मात्र मॉल्स सुरु होणार, अनेक सवलती शक्य

| Updated on: Jul 30, 2020 | 12:32 AM

‘कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला (Maharashtra Lockdown GuidelinesMaharashtra Lockdown Guidelines) आहे.

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला, मात्र मॉल्स सुरु  होणार, अनेक सवलती शक्य
Follow us on

मुंबई : ‘कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. नुकतंच याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र या आदेशात काही नियमही शिथील करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील मॉल्स येत्या 5 ऑगस्टपासून पुन्हा सुरु केले जाणार आहेत. (Maharashtra Lockdown Guidelines)

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार, राज्यात येत्या 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुुर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास  परवानगी दिली जाणार नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे.

राज्यात काय सुरु काय बंद?

  • मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी
  • 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत मॉल आणि मार्केट सुरु होणार
  • मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार
  • ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नसते अशा आऊटडोअर खेळ (मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम) परवानगी
  • सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्यांना सुरु राहण्यास परवानगी
  • अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकान पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार
  • अनावश्यक सेवेती ज्या दुकानांना याआधी परवानगी देण्यात आली होती तेदेखील सुरु राहतील.

टॅक्सी, कॅब,चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 3
रिक्षा – चालक + 2
दुचाकी – चालक + 1

 

नुकतंच केंद्र सरकारने ‘अनलॉक 3’ च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक 3 च्या नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी 5 ऑगस्टपासून जिम सुरु करता येणार आहे. मात्र त्यांना कडक नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.

देशभरात काय सुरु, काय बंद?

  • कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन
  • जीम उघडण्यासाठी परवानगी
  • नाईट कर्फ्यू हटवला
  • 31 ऑगस्टपर्यंत शाळा बंदच राहणार
  • मेट्रो, लोकल ट्रेन बंदच राहणार
  • शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदच राहणार
  • ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन शिक्षण सुरु राहणार
  • सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल बंदच राहणार
  • आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम असेल.
  • सामाजिक/ राजकीय/ क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणिक/ सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांवरही बंदी कायम असेल. (Maharashtra Lockdown Guidelines)

संबंधित बातम्या : 

Unlock-3 Guidelines | ‘अनलॉक-3’च्या गाईडलाईन्स जारी, देशात काय सुरु, काय बंद?

Unlock 3 Guidelines : देशभरात जिम पुन्हा सुरु होणार, अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारी