पुणे : हवामान बदलामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय. पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज (Maharashtra Marathwada rain prediction) आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई आणि पुण्यात 18 आणि 19 तारखेला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने (Maharashtra Marathwada rain prediction) दिला आहे.
विशेष म्हणजे या टप्प्यात मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या मराठवाड्यासाठी ही आनंदाची बाब आहे.
वातावरण बदलामुळे राज्यात बुधवारपासून रविवारपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर 19 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 24 तारखेनंतर पाऊस कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील जिल्हानिहाय अंदाज
मराठवाड्यात बुधवारपासून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यात 21 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात 19 तारखेला अतिवृष्टीचा इशारा आहे. तर औरंगाबादला 17 ते 18 तारखेला अतिवृष्टीचा इशारा आहे. जालन्यात 18 तारखेला जोरदार पाऊस पडेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. बीडमध्ये 17 ते 19 तारखेपर्यंत जोरदार पावसाचा इशारा आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
विदर्भ
विदर्भातही पुढील चार दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 18 आणि 19 तारखेला अतिवृष्टीचा इशारा आहे. 21 तारखेला इथे पावसाचं प्रमाण कमी होईल.
अमरावती आणि यवतमाळला 19 तारखेला अतिवृष्टीचा इशारा आहे. भंडाऱ्याला मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा आहे. नागपूरला 17 ते 19 ला काही ठिकाणी इशारा आहे. चंद्रपूर, गडचिरोली 17-19 तारखेला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात 17 ते 18 तारखेला अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज (Maharashtra rain forecast) वर्तवण्यात आलाय. घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. इथं 20 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडेल. 19 आणि 20 तारखेलाही अतिवृष्टीचा इशारा आहे .
धुळे जिल्ह्यात 18 ते 21 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडेल. नंदुरबारला 20 ते 21 तारखेला जोरदार पाऊस पडेल. जळगावला 17 ते 21 जोरदार पाऊस पडेल. तर नाशिक जिल्ह्यातील काही भागात 18 तारखेला जोरदार पाऊस पडेल. अहमदनगरला 17 तारखेपासून चार दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूरला घाटमाथ्यावर 18 ते 20 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, तर सातारा जिल्ह्यातील काही भागात 18 ते 20 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट माथ्यावरतीही पावसाचा इशारा देण्यात आलाय.
पुण्यात जिल्ह्यात 19 आणि 20 तारखेला अतिवृष्टीचा इशारा आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर सपाट पृष्ठभागावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
पुण्यात बुधवारपासून पाऊस (Maharashtra rain forecast) वाढेल आणि 19 ते 20 तारखेला जोरदार पाऊस पडेल. तर 21 ते 22 हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, त्यानंतर पाऊस कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे
कोकण आणि गोवा, मुंबई
कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस विस्तृत पाऊस पडेल. बुधवारपासून 21 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. 19 तारखेला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. पालघर जिल्ह्यात 19 ते 20 तारखेला अतिवृष्टीचा (Maharashtra Marathwada rain prediction) इशारा आहे.
ठाणे जिल्ह्यात 17 ते 20 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबईमध्ये 17 ते 21 पर्यंत पाऊस पडेल, तर 18 आणि 19 तारखेला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 19 तारखेला जोरदार अतिवृष्टी होईल.