चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग

| Updated on: Oct 01, 2020 | 12:55 PM

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले होते.

चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग
Follow us on

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे सुमारे अडीच लाख निवेदने आल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात काल मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली असून दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Vijay Wadettiwar Wants lifting liquor ban in Chandrapur and Gadchiroli)

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले होते. तर दारूबंदी उठवू नये म्हणून अवघे २५ हजार निवेदने आले होते. त्यामुळे मंत्रालयात दारूबंदी उठवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काल मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत विचार करण्यात आला असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती दीड महिन्यात कॅबिनेटसमोर अहवाल सादर करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दारूबंदी केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अैध दारूची विक्री वाढली होती. बनावट दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यूही झाला असून गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना २७ ऑगस्टला पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याची दारूबंदी उठवण्यासाठी स्थापन करण्यात येणारी समिती काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Vijay Wadettiwar Wants lifting liquor ban in Chandrapur and Gadchiroli)

 

संबंधित बातम्या: 

चंद्रपूरची दारूबंदी : सरकारला महसूल महत्वाचा की नागरिकांचे आरोग्य?

विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय, आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला तरी पानं पुसू नका : देवेंद्र फडणवीस

(Vijay Wadettiwar Wants lifting liquor ban in Chandrapur and Gadchiroli)