पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात, राज्यात यंदा 98 टक्के पाऊस : कृषी हवामान तज्ज्ञ

| Updated on: Jun 01, 2020 | 5:10 PM

यंदा राज्यात साधारण 98 टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला (Maharashtra Monsoon Rain Prediction) आहे.

पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात, राज्यात यंदा 98 टक्के पाऊस : कृषी हवामान तज्ज्ञ
Follow us on

पुणे : दरवर्षी महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात (Maharashtra Monsoon Rain Prediction) होते. मात्र यंदा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मान्सून पूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा राज्यात साधारण 98 टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेल्या (Maharashtra Monsoon Rain Prediction) अंदाजानुसार, यंदा राज्याच्या सर्वच विभागांमध्ये सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात 98 टक्के पावसाची शक्यता आहे.

माञ काही ठिकाणी कमी दिवसात जास्त पाऊस होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत 65 मिलिमीटर पावसाची ओल असली तरच शेतकर्‍यांनी पेरणी करावी, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे.

अकोला पश्चिम विदर्भात यंदा साधारण 670 मिलिमीटर पाऊस पडेल. म्हणजेच सरासरी टक्केवारी 98 टक्के पाऊस पडेल. तर नागपूर मध्य विदर्भ सरासरी पाऊस 938 मिलिमीटर म्हणजेच 98 टक्के पावसाची शक्यता आहे.

त्यानंतर चंद्रपूर पूर्व विदर्भ विभागातील 1167 मिलिमीटर म्हणजे 98 टक्के पाऊस पडेल. परभणी मराठवाडा विभाग 798 मिलिमीटर पाऊस टक्केवारीत 98 टक्के राहील. तर दापोली कोकण विभाग 3272 मिलिमीटर म्हणजेच 98 टक्के पाऊस पडेल.

तर निफाड, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रात 98 टक्के आणि पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, कराड, सोलापूर राहुरी आणि पुणे या ठिकाणी 98 टक्के पावसाचा शक्यता वर्तवली आहे.

मान्सून केरळात दाखल

भारतीय हवमान विभागाने (IMD) 1 जूनला मान्सून केरळात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे केरळात  30 मे रोजी आगमन झालं.

यावर्षी मान्सून सरासरी राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. त्यानुसार, यंदाच्या वर्षी 96 ते 100 टक्के पाऊस पडण्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे. गेल्या वर्षी मान्सून 8 जून रोजी केरळात दाखल झाला (Maharashtra Monsoon Rain Prediction) होता.

संबंधित बातम्या : 

Mumbai Rain | मुंबईकर सुखावले, मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम

बळीराजाला दिलासा, यंदा चांगले पर्जन्यमान, जून ते सप्टेंबर सरासरीच्या 102% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज