मुंबई : संसर्ग नियंत्रणात आल्याने कोरोनामुळे सध्या महाराष्ट्राला थोडाफार दिलासा नक्कीच मिळाला आहे (Maharashtra Mortality Rate Due To Corona Virus). मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यांनी राज्याच्या मृत्यूदराला देशात दुसऱ्या क्रमांकावर आणूण ठेवलं आहे. राज्यात कोरोनाचा मृत्यू दर हा 2.57 टक्क्यांवर आहे. तर, पहिल्या स्थानावर पंजाब आहे. पंजाबचा मृत्यू दर 3.19 टक्के आहे. राज्य आरोग्य विभागाचे स्टेट सर्व्हिलांस आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की आधीच्या तुलनेत मृत्यू दरात घट झाली आहे (Maharashtra Mortality Rate Due To Corona Virus).
देशात पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर जवळपास 11 महिन्यांनंतर शनिवारी कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 1 कोटीच्या पलिकडे गेली. आतापर्यंत एकूण एक लाख 45 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा हा 95 लाखांच्या पार गेला आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान हे महाराष्ट्राला झालं आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला अतिशय वेगाने या रोगाचा फैलाव झाला. दररोज जवळपास 5 ते 6 हजार लोकांना कोरोनाची नव्याने लागण झालेले रुग्ण पुडे येत होते. तर मृत्यूदरही वाढला होता. मात्र, हळूहळू रुग्ण संख्या आणि मृत्यू दर नियंत्रणात येऊ लागले. आज महाराष्ट्राचा मृत्यूदर काही महिन्यांआधीच्या तुलनेत जरी कमी असला तरी तो देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. हळूहळू सर्व अनलॉक केलं जात आहे. आज राज्यातील जवळपास सर्वच गोष्टी सुरु झाल्या आहेत. मात्र, यावेळी कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असूनही अनेक नागरिक हलगर्जीपणा करताना दिसून येत आहेत. तसेच, सणांचे दिवस असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी केली. त्यामुळे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात या महामारीने आतापर्यंत 48 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यांवरुन महाराष्ट्र मृत्यू दराच्या बाबतीत पंजाबपेक्षा फक्त 0.62 टक्क्यांनी मागे आहे.
14 डिसेंबर – 2,949 – 60
15 डिसेंबर – 3,442 – 70
16 डिसेंबर – 4,304 – 95
17 डिसेंबर – 3.880 – 65
18 डिसेंबर – 3,994 – 75
19 डिसेंबर – 3,940 – 74
20 डिसेंबर – 3,811 – 98
कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्यामते, “राज्यातील मृत्यूदर हा गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून आम्ही कोरोनाशी झुंज देत आहोत. आम्हाला या आजाराबाबत अनेक गोष्टी माहिती झाल्या. त्याची वाढ कशी होते, दुसरं कारण म्हणजे आता लोक लवकर रुग्णालयात येतात. तिसरं कारण म्हणजे आता ट्रीटमेंट प्रोटोकॉल अतिशय नियमित मार्गाने दिले जात आहेत.” (Maharashtra Mortality Rate Due To Corona Virus)
संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितलं की, “मृत्यूदर कमी करण्यासाठी आपल्याला अधिक जागरुक राहिले पाहिजे. मास्क घालणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. हे आपल्याला कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत करेल”
डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जुलै महिन्यात राज्याचा मृत्यूदर हा 5 टक्के इतका होता. त्या तुलनेत सध्या राज्याचा मृत्यूदर हा 50 टक्क्यांनी कमी झाला आहे आणि गेल्या 15 दिवसांतील मृत्यूंचं मूल्यांकन केलं, तर मृत्यू दर 1.5 टक्के आहे. आकड्यांमध्ये चढ-उतार होत असतो. त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रात कोरोनामुळे अधिक मृत्यू होत आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा 94.14 टक्के आहे.”
मृत्यू दर
राज्य – प्रतिशत
पंजाब – 3.19
महाराष्ट्र – 2.57
सिक्किम – 2.21
गुजरात – 1.80
पश्चिम बंगाल – 1.74
हिमाचल प्रदेश – 1.67
दिल्ली – 1.66
कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठकhttps://t.co/p2wRY6ywiA#corona #coronavirus #CoronavirusVaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 20, 2020
Maharashtra Mortality Rate Due To Corona Virus
संबंधित बातम्या :
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा