गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली आहेत. रस्त्याचे काम सुरु असताना, नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठी दोनवेळा धमकी दिली होती. मात्र तरीही काम सुरुच राहिल्याने नक्षलवाद्यांनी वाहने पेटवून दिली. यामध्ये ट्रक ,ट्रॅकटर, जेसीबी, बोलेरो अशी जवळपास 30 वाहनांचा कोळसा झाला आहे. कुरखेडा तालुक्यात दादापूर इथं ही घटना घडली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
कुरखेडा तालुक्यातील दादापूरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु होतं. त्यावेळी नक्षलवाद्यांनी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेली वाहने जवळपास दहा ते 12 कोटी रुपयांची आहेत. 60 ते 70 नक्षलवादी रात्री एक वाजता घटनास्थळी आले आणि त्यांनी मजुरांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी वाहनांमधील डिझेल काढून ती वाहने पेटवून दिली. छत्तीसगड सीमा भागातून हे नक्षलवादी आल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra: Naxals have set ablaze 27 machines and vehicles at a road construction site in Kurkheda of Gadchiroli district. pic.twitter.com/62c6iNuJU2
— ANI (@ANI) May 1, 2019
काही दिवसापूर्वी नक्षलवाद्यांनी अनेक भुसुरुंग स्फोट घडवले होते. एका भुसुरुंग स्फोटात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले होते. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये 9 एप्रिलला ही घटना घडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नक्षलवाद्यांनी सातत्याने आपले हल्ले चालूच ठेवले. निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली, छत्तीसगड परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. पण तरीही नक्षल्यांनी आपल्या कारवाई सुरुच ठेवल्या.
संबंधित बातम्या
नक्षलवादी हल्ल्याने छत्तीसगड हादरलं, भाजप आमदारासह पाच जवानांचा मृत्यू
खबऱ्यांना ठार करणार, नक्षलींचं पत्र, गडचिरोलीत 11 दिवसात 7 आदिवासींची हत्या
छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीतील नक्षलींचं पत्र टीव्ही 9 च्या हाती