भाजपाला सर्वाधिक जागा जिंकून देणारे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अखेर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पाच वर्षानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. शपथ सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह सह सर्व मोठे नेते आणि बॉलिवूडची मंडळी आणि बड्या हस्ती सामी झाल्या होत्या. शपथ घेतल्यानंतर नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम मिडियाशी संवाद साधला आहे.यावेळी त्यांना आपल्या मंत्रिमंडळाचा जास्त बदल होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. घटकपक्षात खातेवाटपासंदर्भात सहमती झाल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मिडिया आमच्याकडून काही चुकले असेल तर लागलीच दुरुस्त करते.त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपल्याला आरसा दाखवावा असेच एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले. आता महाराष्ट्र थांबणार नाही. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राने जो वेग पकडला आहे, तो सर्वच क्षेत्रात सुरु राहील. आमची भूमिका दिशा बदलू शकते. माझ्यात शिंदे आणि पवार यांचे विचार एकसारखे आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की वचननाम्यातील आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहे. हे सरकार पारदर्शकपणे काम करेल, पाच वर्षे विरोधकांशी बदला घेणार नाही तर आम्ही कामात घालवू. लाडकी बहीण आम्ही सुरुच ठेवू ,या योजनेत आता १५०० रुपये मिळत आहेत.ते आता वाढवून २१०० केले जातील. परंतू आधी आम्ही आर्थिक सोर्स मजबूत करणार आहे त्यानंतर या रकमेत वाढ केली जाणार आहे.आम्ही मार्चच्या अर्थसंकल्पात ही रक्कम वाढवू, आम्ही काही अर्जांची छाननी देखील करणार आहे. सर्व अर्जांची छाननी होणार नाही.काही अर्जात विसंगती असू शकते असेही ते म्हणाले.
सीएम फडणवीस यांनी सांगितले की ९ डिसेंबर रोजी मुंबईत अधिवेशन भरविण्यात येणार आहे. आधी विधानसभा अध्यक्षाची निवड होईल. नागपूर हिवाळी अधिवेशाना आधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. सध्याच्या सरकारच्या तुलनेत काही खात्यात अदलाबदल होणार आहे. मोठा बदल होणार नाही. नदी जोड प्रकल्पावर लक्ष दिले जाणार आहे. मी पहिली सही Bone Marrow ट्रांसप्लांटसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान देण्याच्या फाईलवर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मी साडे सात वर्षे सत्तेत आहे. जनादेश आणि लोकांचा प्रेमाचा आमच्यावर दबाव आहे. त्यामुळे राज्याचा महसुल वाढविण्यावर भर राहणार आहे. कठोर प्रशासकीय निर्णय घ्यावे लागणार आहेत. आम्ही अनेक योजना आणल्या आहेत. त्यामुळे सामाजिक खर्च वाढला आहे.त्यामुळे आम्हाला अर्थसंकल्पात शिस्त आणावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सुधारली पाहीजे असेही ते म्हणाले. शपथग्रहण समारंभासाठी आपण शरद पवार आणि राज ठाकरे आणि अन्य नेत्यांना आमंत्रण दिले होते. काही व्यैयक्तिक कारणांनी ते आले नाहीत. विरोधकांनी चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहीजे त्यांनी खूनशी वागू नये असेही ते म्हणाले. शक्तीपीठ मार्गा संदर्भात माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की कोल्हापूरात विरोध होत आहे. आम्ही यावर सर्वसहमती घेऊन काम करु. जमीन संपादन होईपर्यंत रस्त्याचा आरेखन तयार केले जाईल. कारण शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचा चित्र बदलणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.