मुंबई : राज्यात पोलीस दलात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला (Maharashtra Police Corona Discharge) आहे. आज एका दिवसात 35 पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकीकडे कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत असताना आता कोरोनामुक्त पोलिसांचाही आकडा वाढत आहे. मात्र दुर्देवाने एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 28 वर पोहोचली आहे.
राज्यात आतापर्यंत 1 हजार 479 पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची (Maharashtra Police Corona Discharge) तीव्र लक्षण आढळली आहेत. आतापर्यंत 188 पोलीस अधिकारी आणि 1291 पोलीस कर्मचाऱ्यांत कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान कोरोनाबाधितांमध्ये मुंबई पोलीस दलातील पोलिसांची संख्या जास्त आहे.
मुंबई पोलीस दलातील जवान मोठ्या संख्येने कोरोनाबाधित होत आहे. हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी स्वत: कंबर कसली आहे. त्या अनुषगांने आता प्रत्येक पोलीस स्टेशन सॅनिटाईज करण्याचे काम सुरु आहे. मुंबई पोलीस स्वत: हे काम करत आहे.
मुंबईतील सर्व पोलीस स्टेशन आणि पोलीस कार्यालय अशा एकूण 223 ठिकाणी निर्जंतुकीकरण आणि धूर फवारणी केली जाणार आहे. मुंबई पोलीस स्वत: हे करणार असून यासाठी पोलीस दलाने एक वेगळे पथक नेमले आहेत. हे पथक तयार करुन 23 पोलीस कर्मचाऱ्यांना या कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच परिमंडळ 5 मध्ये प्रत्येकी एक वाहन आणि त्या वाहनांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी आणि धूर अशा दोन मशीन बसवण्यात आल्या आहेत. या मशीनने दररोज 30 ते 40 निर्जुंतुकीकरण केले जाणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सह पोलीस आयुक्त नवल बजाज यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलावर प्रचंड ताण आले आहे. त्यामुळे कुठे तरी त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि आपल्या जवानांना कोरोनापासून अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी वेगळे पथक नेमण्यात आलं (Maharashtra Police Corona Discharge) आहे.
संबंधित बातम्या :
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!
वर्ध्यातील 21 वर्षीय कोरोनामुक्त तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू
आरोग्यमंत्र्यांकडून मध्यरात्री 2 पर्यंत खासगी रुग्णालयांची झाडाझडती, मुंबईतील 4 रुग्णालयांना नोटीस