मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे (Maharashtra Police Corona Cases) महाराष्ट्र पोलीस दलालाही कोरोनाने विळखा घातला आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल 329 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 786 वर पोहोचला आहे.
महाराष्ट्र पोलीस विभागातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस (Maharashtra Police Corona Cases) वाढ होत आहे. आज एका दिवसात 72 पोलिसांचा रिपोर्ट कोरोना पाॉझिटिव्ह आला आहेत. तर काल 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हा 786 वर गेला आहे.
यात 88 अधिकारी आणि 698 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लागण झालेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. जवळपास 75 अधिकारी आणि 628 पोलीस कर्मचारी अशा एकूण 703 पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षण दिसत आहे.
पोलिसांना कोरोनाचा विळखा
सुदैवाने यातील 13 अधिकारी आणि 63 पोलीस कर्मचारी असे एकूण 76 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने आतापर्यंत 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीत वाढले
राज्यात संचारबंदीच्या काळात 1 लाख, 1 हजार 245 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 19 हजार 513 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय जवळपास 55 हजार 650 वाहन जप्त करण्यात आली आहेत.
औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार, 24 तासात 54 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा 562 वरhttps://t.co/JauZKTdKLC #Aurangabad #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2020