मुंबई : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Maharashtra Police Corona Positive Cases) आहे. आज एका दिवसात तब्बल 60 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1061 वर पोहोचली आहे. यात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र (Maharashtra Police Corona Positive Cases) मेहनत घेत आहेत. गेल्या दोन दिवसात 136 पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. आज (15 मे) एका दिवसात 60 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काल एका दिवसात 76 पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 061 वर पोहोचली आहे. यात 112 अधिकारी आणि 949 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाची लक्षण असणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 90 अधिकारी आणि 788 पोलीस कर्मचारी अशा एकूण 878 पोलिसांत लक्षण दिसून येत आहेत. तर 22 अधिकारी आणि 152 पोलीस कर्मचारी असे एकूण 174 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनदरम्यान 1 लाख गुन्हे दाखल
राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या 22 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचा 53 वा दिवस आहे. तेव्हापासून राज्यात कलम 188 नुसार 1 लाख 07 हजार 256 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 20 हजार 471 व्यक्तींना अटक करण्यात आली आहेत. तर 58 हजार 291 वाहन जप्त करण्यात आली आहेत.
राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का असलेल्या 672 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे.
तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या 1304 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कालावधीत आरोपींकडून 4 कोटी 25 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 34 घटना (Maharashtra Police Corona Positive Cases) घडल्या आहेत.
संबंधित बातम्या :
मुंबईत पुन्हा पोलिसाचा ‘कोरोना’मुळे बळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना, बाधित पोलिसांची संख्या 618 वर