मुंबई : राज्यातील पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राज्यातील काही पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना संबंधित पोलिसाच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येणार आहे. नुकतंच अनिल देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली. (Maharashtra police death due Corona whose family stay in government house until retirement)
“संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या लढ्यात पोलीस दिवस रात्र लढत आहेत. यात जवळपास 51 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या कुटुंबाला 65 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
त्यासोबतच ज्या शासकीय निवासस्थानात या पोलिसांचं कुटुंब राहतं, त्या कुटुंबांना त्याच शासकीय निवासस्थानात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत राहण्याचाही निर्णय घेण्यात आला,” असेही अनिल देशमुख यांनी सांगितले. याबाबतचा एक व्हिडीओ अनिल देशमुखांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
दरम्यान यापूर्वी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली होतील. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल, असेही आयुक्तांनी सांगितले होते.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 26, 2020
राज्यात 4 हजारहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण
दरम्यान सद्यस्थितीत राज्यात 4 हजार 271 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 450 अधिकारी तर 3 हजार 821 कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. तर यातील 48 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 123 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 1 हजार 100 पोलीस कोरोनाबाधित आहेत. (Maharashtra police death due Corona whose family stay in government house until retirement)
संबंधित बातम्या :