पुणे : राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली (Maharashtra Rain Alert). तर धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही भागात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. घाट माथ्यावरती अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे (Maharashtra Rain Alert).
कोकण, गोव्यात 18, 21 आणि 22 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला पूर्व विदर्भात ‘रेड अलर्ट’ आहे. पुणे-सातारा 18, 21 आणि 22 तारखेला घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर कोल्हापूरला मंगळवारी, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 18, 21 आणि 22 ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र पाऊस झाला. राज्यात सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस आतापर्यंत पडला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे हवामान बदलामुळे राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात जास्तीत जास्त जागेवर पाऊस पडेल. दोन्ही विभागात 75 टक्के पेक्षा जास्त भागावर पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 72 तासात अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर 21 आणि 22 तारखेला अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे (Maharashtra Rain Alert).
कोकण गोव्यात चार दिवस 18 ते 21 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. 22 तारखेला काही भागात 22.4 सेंटीमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी होईल. तर मध्य महाराष्ट्रात 18, 21 आणि 22 अतिवृष्टीचा इशारा आहे. तर पुणे, सातारा 21आणि 22 अतिवृष्टी तर कोल्हापूरला आज मंगळवारी जोरदार अतिवृष्टीचा इशारा आहे.
मराठवाड्यात 20 आणि 21 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. तर विदर्भात पुढील 48 तास जोरदार पावसाचा इशारा आहे. इथे 20 आणि 21 तारखेला पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे.
राज्यात आतापर्यंत साधारण पावसापेक्षा सोळा टक्के जास्त पाऊस पडला आहे. कोकण गोव्यात 22 टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात 29 टक्के जास्त, मराठवाड्यात 36 टक्के जास्त पाऊस तर विदर्भात नऊ टक्के कमी पाऊस पडला आहे. विदर्भात अकोला, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात कमी पाऊस झाला. मात्र, पुढील 48 तासात इथ ही चांगला पावसाचा अंदाज असून तूट भरुन निघेल.
तर सांगली जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोल्हापूरला आज मंगळवारी काही ठिकाणी घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर 18, 21 आणि 22 तारखेला अतिवृष्टीचा इशारा आहे.
पुण्यात मंगळवारी आणि बुधवारी पाऊस थोडा कमी राहील. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. मात्र, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 20 आणि 23 तारखेला शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर घाटमाथ्यावर 20 आणि 23 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 24 तारखेला हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मात्र घाटात जोरदार पाऊस पडेल. 25 आणि 26 तारखेला पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
त्याचबरोबर मुंबईमध्ये पुढील 72 तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 21 आणि 22 तारखेला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Rain Updates: कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मराठवाड्यातही मुसळधार, नदी-नाल्यांना पूरhttps://t.co/rXabt6ZV9m#RainUpdates #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 17, 2020
Maharashtra Rain Alert
संबंधित बातम्या :
मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा
Rain Updates: रत्नागिरी-गडचिरोलीला पावसानं झोडपलं, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल